बहिण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन

शहरातील रामनगर परिसरातील तलवात बुडून बहिण-भावाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी घडली असून बीड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुरज राजेश पवार (13) आणि रंजना राजेश पवार (8) अशी त्या बहिण-भावांची नावे आहेत. सुरज आणि रंजना यांचे आई-वडिल हे विहीर कामगार आहेत. रामनगर परिसरातील तलावाच्या जवळच एका विहीरीचे काम चालु आहे. आई-वडिल विहीरीचे काम करत असताना सुरज आणि रंजना हे तलावाशेजारी खेळत होते. खेळता-खेळता ते तलावात बुडून गेले. तलावात बुडून त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बहिण-भावाचा तलावात बुडून अंत झाल्याने पवार कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.