बहीण हट्टी आहे, तिला सांभाळा, चिठ्ठी लिहून विद्यालयीन युवतीने संपवले जीवन

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन

बहीण हट्टी आहे, तिला सांभाळा अशा आशयाची चिठ्ठी लिहून विद्यालयीन युवतीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (गुरुवार) दि. ७ रोजी दुपारी ३.४५ पूर्वी ही घटना घडली, घरी कोणी नसताना तिने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पल्लवी मलकारी हेगडे (वय १९, रा. धामणी रोड, स्वर्ग बंगला, सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पल्लवी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ती आपल्या कुटुंबासह धामणी रस्त्यालगत राहत होती. घरातील मंडळी बाहेर गेली असताना घरात कोणी नसल्याचे पाहून पल्लवीने पंख्याला साडीने गळफास घेतला. काही वेळाने बाहेर खेळत असलेली बहीण घरी आल्यानंतर ही गोष्ट समजली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सुडाईड नोट सापडली
पल्लवीने गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. पंचनाम्यावेळी पोलिसांना ती सापडली असून त्यात तिने , बहीण हट्टी आहे, तिला सांभाळा, आजपर्यंत माझा चांगला सांभाळ केला आहे. माझ्या आत्महत्येला कोणास जबाबदार धरु नये असे लिहले आहे. पोलिसांनी चिट्ठी जप्त केली असून तिचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे.