धक्कादायक ! ‘WiFi’ पासवर्डसाठी लहान भावाकडून बहिणीची हत्या

वाशिंग्टन : वृत्तसंस्था – बहिणीचा खून केल्याप्रकरणी १८ वर्षाच्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी वायफाय पासवर्डसंबंधी झालेल्या वादानंतर धाकट्या भावाने बहिणीची हत्या केली होती. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

जॉर्जियात राहणाऱ्या अमेरिकन नागरिक केव्हिन वॉटकिन्सने त्याच्या बहिणीचा गळा दाबून खून केला होता. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्याला दोषी ठरवले गेले. घरातील वायफायचा स्पीड स्लो असल्यामुळे केवनने वायफायचा पासवर्ड बदलला होता आणि तो पासवर्ड फक्त त्यालाच माहिती होता. या पासवर्डवरून त्याचे आणि त्याच्या आईचे भांडण झाले. या भांडणांमध्ये बहीण पडली. त्यानंतर या १६ वर्षीय भावाने २० वर्षीय बहिणीची गळा दाबून हत्या केली.

घटनेच्या वेळी बहिण २० वर्षांची होती. दरम्यानच्या प्रयत्नात, भाऊ आपल्या बहिणीशी भांडला आणि नंतर त्याने त्याची हत्या केली.घटनेच्या वेळी बहिणीचे लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा देखील होता. घटनेच्या वेळी भाऊ फक्त १६ वर्षांचा होता.

आरोग्यविषयक वृत्त