पुण्यात बहिणीच्या नवर्‍यानं केलं अल्पवयीन मेहुनीचं अपहरण

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –   एका अल्पवयीन तरुणीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यानेच (sisters-husband-kidnapped) अपहरण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड परिसरात ही घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अरुण संजय काळे (वय 24) असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर अपहरण झालेल्या तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून त्यांना चार मुली आहेत. या चार मुलीपैकी मोठ्या मुलीचे लग्न आरोपी अरुण याच्याशी झाले आहे. त्याला दोन मुले आहेत. फिर्यादीचा भाजी विक्रीचा व्यवसाय असल्याने, त्यांना मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी जावे लागत असत. पहाटेच्याेवेळी भाजी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जात होत्या. घरामध्ये मुली असल्याने त्या नेहमी बाहेरून दाराला कुलूप लावून जात होत्या.मात्र आरोपीला सासूबाई बाहेर गेल्याचे दिसताच. त्याच्या जवळ असलेल्या चावीने घराचे दार उघडले आणि 17 वर्षीय मेहुणीला बाहेर बोलवून घेऊन निघून गेला. त्यानंतर फिर्यादी या मार्केटमधून घरी परतल्यावर आजूबाजूला शोध घेतला असता. काही तपास लागला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी जावयाविरोधात तक्रार दिली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपहरण झालेल्या तरुणीचा शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक अमोल काळे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like