बहिणीच्या नवर्‍यानं दुसरं लग्न केल्यानं मेव्हण्यानं केले ‘असं’ काही

लग्न /चिखली : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणीच्या नवऱ्याने दुसरे लग्न केल्याच्या रागातून मेव्हण्याने शिवीगाळ करत बहिणीच्या नवऱ्याच्या वडिलांचे अपहरण केले. हा प्रकार सोमवारी (दि.23) रात्री दीडच्या सुमारास चिखली येथील गजानन हौसिंग सोसायटी, पार्वती कॉम्पलेक्स शेजारी, चिंचेचा मळा, म्हेत्रेवस्ती येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी कल्याण संभाजी बिडगर (रा. कात्रज) आणि त्याच्या इतर तीन साथिदांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय प्रभु मदने (वय-30 रा. गजानन हौसिंग सोसायटी, पार्वती कॉम्पलेक्स शेजारी, चिंचेचा मळा, म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मोठा भाऊ बापु मदने याने दुसरे लग्न केले आहे. याच रागातून बापु मदने याचा मेव्हणा कल्याण व त्याचे इतर तीन साथीदारांनी सोमवारी रात्री मदने यांच्या घरी येऊन त्यांचे वडील प्रभु सर्जेराव मदने (वय-60) यांना शिवीगाळ केली.

आरोपी कल्याण बिडगर आणि त्याच्या इतर साथिदारांनी फिर्यादी यांचे वडिल प्रभु यांना बळजबरीने ज्युपीटर दुचाकीवर बसवून पळवून नेले. आरोपींनी काही अंतरावर त्यांच्या वडिलांना सोडून देत तेथून फरार झाले. दत्तात्रय मदने यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन चौघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेंद्र आहेर करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/