जेलमध्ये खूपच मच्छर, सासरेबुवा रात्रभर झोपू शकले नाहीत, आजम खानच्या सुनेनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामपूरनंतर सीतापूर तुरुंगात हलवण्यात आल्यानंतर आजम खान त्यांची पत्नी तंजीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आजम यांना भेटण्यासाठी त्यांची सून सिदरा खान आणि मुलगा अदिब आजम शुक्रवारी सीतापूर जेलमध्ये पोहोचले होते. त्यांनी तुरुंगात त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर बाहेर आलेल्या सून सिदरा खान आणि त्यांचा मुलगा आदिब आजम यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. माध्यमांशी बोलताना सिदरा म्हणाल्या की, कुटूंबाची तुरुंगातील दशा मला पाहावली गेली नाही. खूप दु:ख झाले.

आजम खान यांच्या बद्दल बोलताना त्यांची सून सिदरा म्हणाली की, तुरुंगात मच्छर खूप आहेत त्यामुळे त्यांना रात्री झोप देखील लागली नाही.

अल्लाहवर विश्वास आहे –
सिदरा म्हणाल्या की, त्यांच्या सासूला पाठीचा त्रास आहे.मागील वर्षीच त्यांची पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याशिवाय त्यांनी तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, सासरे आणि सासू यांची तब्येत बिघडत आहे असे असताना तुरुंग प्रशासनाने त्यांनी औषध पाणी केले नाही. त्या म्हणाल्या की अल्लाहवर विश्वास आहे, न्यायालयाचा जो काही निर्णय येईल तो आमच्या बाजूने असेल. कारण जी एफआयआर दाखल झाली आहे, ती खोटी आहे.

तसेच त्यांना सितापूर तुरुंगात हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली नव्हती. जशी मला ही माहिती मिळाली तसे मी त्यांना भेटायला आले. त्यांनी शासन आणि प्रशासनाला मागणी केली की त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना औषधपाणी करावे. दोघांचे वय झालेले आहे हे लक्षात घेऊन त्यांची काळजी घ्यावी.

सीतापूर तुरुंगात आजम यांना हलवण्यात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी रांगा लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम, संभळचे आमदार पिंकी यांच्यासह स्थानिक नेते त्यांची आणि त्यांच्या कुटूंबाची भेट घेत आहेत.

You might also like