Sitaram Kunte | सीताराम कुंटेंचा ED समोर खुलासा; म्हणाले – ‘..त्यावेळी डीजीपींनी मुख्यमंत्र्यांना कोणतेही उत्तर दिले नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sitaram Kunte | राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस बदलीबाबत (Police Officer Transfer) माजी SID प्रमुखांनी दिलेल्या अहवालावर महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, त्यावेळी पोलीस महासंचालकांनी (DGP) मुख्यमंत्र्यांना (CM) कोणतेही उत्तर दिले नव्हते. असं राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ED) दिलेल्या निवेदनात सांगितलं.

 

”जुलै 2020 साली, माजी SID प्रमुख रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली, पोस्टिंग मध्ये कुणीतरी मध्यस्ती करत असल्याने हे फोन कॉल्स रेकाॅर्ड केले होते. त्यानंतर शुक्ला यांनी त्या कॉल रेकाॅर्डच्या आधारे अहवाल तयार केला. तसेच तो DGP सुबोध जैस्वाल (IPS Subodh Jaiswal) यांना पाठवण्यात आला, त्यानंतर जैस्वाल यांनी तो अहवाल कुंटे यांना 27 ऑगस्टला पाठवला. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे म्हटले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हा अहवाल जेव्हा पाठवण्यात आला तेव्हा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढला होता. म्हणून कुठलीही कारवाई किंवा बदली झाली नाही.” अशी माहिती सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुढे सिताराम कुंटे म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर 28 सप्टेंबरला सुबोध जैस्वाल यांना पत्र पाठवले, त्यात अहवालामध्ये नमूद केलेल्या बाबी सरकारने गांभीर्याने घेतल्याचे नमुद केले होते.
दरम्यान त्या पत्रात DGP ना म्हटले की, त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करायची याबाबत पुराव्यासह त्यांचा प्रस्ताव पाठवावा.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेचे पत्र असून देखील DGP कार्यालयाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सिताराम कुंटे यांनी म्हटले आहे.
तर नंतर तात्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात या अहवालाच्या आधारे सरकारवर गंभीर आरोप केले होते,
त्यानंतर मार्च 2021 साली मुख्यमंत्र्यांनी मला अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितले होते.
आणि मग 25 मार्चला मी एक तथ्यात्मक अहवाल दिला.” असा कुंटे यांनी ईडीसमोर खुलासा केला आहे.

 

Web Title :- Sitaram Kunte | DGP maharashtra did not give any answer to the chief minister said sitaram kunte revelation to the ED

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा