Sitaram Kunte | अनिल देशमुख प्रकरणात सीताराम कुंटेंची 6 तास चौकशी, जाणून घ्या नेमकं काय झालं?

0
173
Sitaram Kunte | ed interrogated sitaram kunte for six hours on former home minister anil deshmukh case
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आज ईडी (ED) कार्यालयात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात (Anil Deshmukh case) जबाब नोंदवण्यासाठी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सलग सहा तास चौकशी केली. अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत (police officers Transfer) आरोप करण्यात आला होता. देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्या करताना मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) झाली का? या विषयी कुंटे यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली.

 

अनिल देशमुख गृहमंत्री असताना सीताराम कुंटे (Sitaram Kunte) हे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (Home Department Additional Chief Secretary) पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर येईल अशी आशा ईडीला आहे. विशेष म्हणजे ईडीने यापूर्वी कुंटे यांना तीन वेळा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स (Summons) बजावले होते. मात्र, तीनही वेळी त्यांनी प्रशासकीय कामे आणि मंत्रिमंडळ बैठकीचे कारण दिलं होतं. तीनवेळा गैरहजर राहिल्यानंतर कुंटे यांनी ईडीकडून वेळ मागून घेतला होता. त्यानंतर अखेर कुंटे आज ईडी कार्यालयात हजर झाले.

काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे (API Sachin Vaze) याला दरमहिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणात देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांनाही अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार
विशेष म्हणजे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर फोन टॅपिंग प्रकरण (Phone tapping case) समोर आलं. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) या त्यावेळी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख (Head of State Intelligence) होत्या. त्यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या अहवालानंतर गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी करत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला होता. यामध्ये रश्मी शुक्ला यांनी खोटे बोलून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती, असे सांगितले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीताराम कुंटे यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली.

 

Web Title :- Sitaram Kunte | ed interrogated sitaram kunte for six hours on former home minister anil deshmukh case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation | शहरातील अनाधिकृत बॅनर अन् झेंड्यांबाबत पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !

Bombay High Court | ‘…तुमच्याविरोधात कारवाई का करु नये?’ उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल

Rakesh Jhunjhunwala | चांगली कमाई करून देऊ शकतो राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोतील रू. 250 चा ‘हा’ स्टॉक!