Sitaram Kunte | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ वाढवला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्य सचिव (State Chief Secretary) सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्य सरकारने त्यांनी तीन महिन्यांची मुदतवाढ (Extension) दिली आहे. सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकारसोबत (Thackeray government) असलेले चांगले संबंध यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कुंटे (Sitaram Kunte) फेब्रुवारीपर्यंत राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
सीताराम कुंटे हे मूळचे सांगलीचे आहेत. त्यांच्या आजोबांचा कुंटेवाडा सांगलीतील कापड पेठेत होता. त्यांचे बालपण पटणा शहरात गेले.
उच्च शिक्षणासाठी दिल्लीत स्थायिक झाले. त्यांचे वडील बिहार कॅडरचे आयएएस (IAS) होते. सहकारी प्रवीणसिंह परदेशी (Praveen Singh Pardeshi) यांना मागे टाकत त्यांना मुख्य सचिव म्हणून संधी मिळाली.

 

Web Title :- Sitaram Kunte | Thackeray Government Extended tenur of Chief Secretary Sitaram Kunte

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Multibagger Stocks | स्वस्तात मिळत आहेत Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोचे शेयर, चांगल्या रिटर्नची शक्यता