Sitaram Yechury : ‘तुम्ही काहीच करु शकत नसाल तर खुर्ची का नाही रिकामी करत’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, औषधांचा आणि बेड्सचा तुटवडा, लसीकरणासंदर्भातील गोंधळ याचा संदर्भ देत कम्युनिस्ट पार्टी इंडिया (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांनी चिंता व्यक्त करत ट्विटरद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही काहीच करु शकत नसाल तर खुर्ची का नाही रिकामी करत? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. येचुरी म्हणाले, तुम्ही ऑक्सिजन पुरवू शकत नाही, लसींचा पुरवठा करू शकत नाही, रुग्णालयांमध्ये तुम्ही औषधं आणि बेड उपलब्ध करू देऊ शकत नाही. कोणत्याच प्रकारे तुम्ही मदत करू शकत नाही. केवळ खोटा प्रचार, कारणं आणि असत्य गोष्टींच पसरवू शकता अशी टीका त्यांनी या ट्विट मध्ये केली आहे. त्याचबरोबर एक शेरही लिहिला आहे. कुर्सी है तुम्हारा जनाज़ा तो नहीं है, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते, असं ट्विटच्या शेवटी येचुरी यांनी म्हटलं आहे.

कोरोनमुळे येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरींचं मागील महिन्यात निधन झालं होत. ट्विट करून येचुरी यांनी याबाबतची माहिती दिली होती. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी डॉक्टर, नर्स, पहिल्या फळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि साफसफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. मुलाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी या लोकांनि मदत केल्याचे त्यांनी म्हंटले होते.

दरम्यान, त्यांनी आणखी एक ट्विट केले होते त्यात मला माहितीय की मी एकटाच हे दु:ख सहन करत नाहीय. या साथीमुळे असंख्य लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हंटल आहे तर अन्य एका ट्विट मध्ये त्यांनी नवीन इमारतीवरून मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, संसद भवनाच्या नवीन इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. हे बांधकाम थांबवून हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरावा. मोदींनी आपल्या अहंकारामुळे हे बांधकाम सुरु ठेवलं आहे आणि दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरत आहेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही, असं येचुरी यांनी म्हंटल आहे.

गुरुवारी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या भूमिकेवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं. नवीन संसदभवन आणि पुतळे उभारण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करता येतात आणि लसीकरणासाठी पैसे खर्च करता येत नाहीत का?, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला विचारला.

दिल्लीत नवीन संसद भवन म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या बांधकामासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून या प्रोजेक्टला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे हे काम थांबणार नाही यासाठी मालाची तसेच मजुरांची ने आण करण्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे.