‘इन्कम टॅक्स’ मध्ये सूट हवी असल्यास कंपनी म्हणून FPIs ‘रजिस्ट्रेशन’ करा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी स्पष्टपणे सांगितले की, ट्रस्टशी संबंधित रजिस्ट्रर्ड ‘फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टर्स’ (FPIs) ला नवीन सरचार्ज द्यावा लागेल. त्यांनी म्हटले की, कंपनीशी संबंधित रजिस्टर्ड एफपीआयच्या टॅक्स दरवाढीवर परिणाम होणार नाही. FPI ट्रस्टशिवाय बजाज कंपनीशी संबंधित रजिस्ट्रेशन करण्यावर विचार केला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन टॅक्सशी संबधित प्रश्नावर बोलत होत्या. यादरम्यान लोकसभेत वित्त विधेयक २०१९ ला मंजुरी देण्यात आली.

९९% कंपन्यांच्या टॅक्समध्ये घट
त्यांनी म्हटले की, वित्तविधेयकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष करात करण्यात आलेल्या दुरुस्तीचा उद्देश मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे ९९ % कंपंन्यांच्या करामध्ये घट होईल.

कंपनीच्या संबंधित रजिस्टर्ड एफपीआयवर परिणाम नाही
त्यांनी FPI शी प्रस्तावित टॅक्स संबंधित म्हटले की, FPI ला नवीन टॅक्स सरचार्ज द्यावा लागेल. तरीसुद्धा ते कंपनीच्या रूपात स्ट्रकचेरींगच्या पर्याय वापरता येऊ शकतो. यामुळे कंपनीच्या संबंधित रजिस्टर्ड एफपीआयवर परिणाम होणार नाही

१ % करदात्यांना अड्जस्ट करू शकतात करदाते
सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, बजेटच्या प्रस्तावाचा उद्देश ईज ऑफ डूइंग आणि मेक इन इंडिया ला प्रोत्साहन देणे हा आहे.