निर्मला सीमारमण यांना ट्विटर युजर म्हणाला ‘स्वीटी’, अर्थमंत्र्यांनी उत्तर देवुन केली बोलती बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना एका ट्विटर युजरने स्वीटी म्हणून संबोधले एवढेच नाही तर युजरने स्वामी विवेकानंद यांच्यावरील प्रसिद्ध विधान चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे आरोप देखील सितारमन यांच्यावर केला.

अर्थमंत्री सितारमन यांनी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांचा विचार सांगणारे एक ट्विट केले होते. ‘उठा,जागे व्हा आणि जास्त स्वप्न पाहू नका’. ही स्वप्नांची भूमी आहे जिथे कर्म आपल्या विचारांतून निघून माळ बनवतात. मजबूत बना आणि खऱ्याच सामना करा आणि एक रहा. विचारांचा अंत होऊ द्या. या विवेकानंदांच्या ओळी लिहीत ‘द कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद’ असे कॅप्शन दिले होते.

या ट्विटबाबत सुजॉय घोष नावाच्या एका ट्विटर युजरने अर्थमंत्र्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की, त्यांनी योग्य अर्थ सांगितलेला नाही. युजरने हे कोठून घेतलेले आहे सांगत लिहिले की, स्वीटी हे, आपले ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असे आहे ना की, जास्त स्वप्ने पाहू नका’. हे बजेट 2020 नाही की तुम्ही याबाबत आम्हाला इशारा द्यावा.

उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय गाठण्यापर्यंत थांबू नका ही एक उपनिषेदातील एका श्लोकाद्वारे प्रेरित केलेली घोषणा आहे. या उपनिषदामुळे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वामी विवेकानंद खूप प्रसिद्ध झाले होते.

अर्थमंत्र्यांनी घोष यांना उत्तर देताना सांगितले की आपण यामध्ये सहभाग घेत आहेत याचा आनंद आहे. चुकीचे विधान त्यांनी ट्विट केलेले नसल्याचे सितारमन यांनी यावेळी स्पष्ट केले. लोक सोशल मीडियावर अर्थ मंत्र्यांच्या उत्तराचे कौतुक करीत आहेत, तर घोष यांच्यावर टीका केली जात आहे.

सीतारमन यांनी घोष यांना उत्तर देताना म्हंटले की, ‘आनंद आहे तुम्ही यामध्ये आवड दाखवली’. त्यानंतर त्या पुढे म्हणतात मी सांगितले की हे ‘द अवेकेन इंडिया’चे आहे जे की ऑगस्ट 1898 मध्ये लिहिले गेलेले आहे. तसेच याच्या खाली मी याचा संदर्भ देखील दिला असल्याचे अर्थमंत्री सांगतात. जर तुम्हाला याबाबत अधिक आवड असेल तर अद्वैत आश्रमातर्फे याचे प्रकाशन केले गेले असल्याचे देखील यावेळी सीतारमन यांनी घोष यांना ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –