एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करणे धोकादायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही एका जागी बसून सलग 9 तासांपेक्षा जास्त काम करत असाल तर ही तुमच्यासाठी मृत्यूची घंटा आहे. कारण नऊ तासांहून अधिक काळ दररोज बैठं काम करणाऱ्यांचा अवेळी मृत्यू होण्याची शक्यता कित्येक पटीने जास्त असते. याविषयी ब्रिटीश मेडिकल जर्नल (BMJ) ने एक अहवाल सादर केला आहे.

अहवालानुसार, संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शारीरिक हालचाली आणि व्यायाम याचा जीवनमानाशी असलेल्या संबंधाचा तौलनिक अभ्यास केला. त्यानुसार जे लोक 9 ते 9.30 तास बसून काम करतात आणि त्यांची फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आठवड्याला 150 मिनिटं म्हणजे दररोज 20 मिनिटांपेक्षा कमी असते. त्यामुळे यावेळी मृत्यूचा धोका अधिक वाढतो.

अवेळी मृत्यूचा धोका टाळण्यासाठी उपाय –

मृत्यूचा धोका टाळायचा असेल तर दररोज किमान 24 मिनिटं मध्यम तीव्रतेच्या शारीरिक हालचाली म्हणजेच हलका व्यायाम करायलाच हवा. एका जागी बसून काम करणाऱ्यांनी दर तासाने काही मिनिटांसाठी जागचं उठून थोडं भरभर चालणं किंवा ऊठ-बस करायलाच हवी. 300 मिनिटं दररोज शरीराची हालचाल होईल असं काम करायलाच हवं. 18 ते 64 वय असणाऱ्या व्यक्तींना दर आठवड्याला किमान 150 मिनिटांची शारीरिक हालचाली असलेली कामं करणे आवश्यक आहे. अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

 

Visit  :Policenama.com