Coronavirus : ‘कारोना’मुळं पाकिस्तानच्या सिंध प्रांतात परिस्थिती गंभीर, 6 जणांचा मृत्यू, लष्कराला बोलावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमधील परिस्थिती सतत खराब होत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे, परंतु असे असूनही लोक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतमध्ये सैन्याला बोलवावे लागले आहे. ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 799 लोकांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या सिंधमध्ये 352 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सिंधनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 225 लोक संसर्गित आहेत.

या आधी रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला लॉकडाऊन करण्यास नकार दिला होता. यातून अराजक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. इम्रान यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना वेगळे करण्याचे आवाहन केले. देशभरात कोरोना व्हायरसच्या घटनांच्या वाढीसंदर्भात देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी पुन्हा सांगितले की, ही बंदी अराजक परिस्थितीला कारणीभूत ठरेल कारण 25 टक्के पेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या अशा परिस्थितीमध्ये बंदी करण्याची गरज नाही.

पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक आरोग्यमंत्री डॉ. जफर मिर्झा म्हणाले की, आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसच्या 4 हजाराहून अधिक संशयित प्रकरणांची तपासणी झाली आहे. ते म्हणाले की, गेल्या 24 तासांत 13 हजाराहून अधिक लोकांची चाचणी केली गेली, तर इराणहून येणाऱ्या 3,378 लोक वेगवेगळ्या रुग्णालयात उपस्थित आहेत. डॉ. जफर मिर्झा म्हणाले की, पाकिस्तानमध्ये दाखल झालेल्या 14 लाख लोकांची स्क्रिनिंग केली गेली आहे. शनिवारी पाकिस्तान सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली होती आणि व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे सेवा देखील प्रतिबंधित केली होती.