‘डार्क स्किन टोन लाइट’ करण्यासाठी करा ’हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसोबतच प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, तिचा स्किन टोनही लाइट रहावा, त्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल. परंतु, असे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा योग्य स्किन केअर रूटिन फॉलो केली जाईल. चेहर्‍यावर मेकअप लावल्याने काहीवेळासाठी डाग लपवणे शक्य होते. परंतु, क्लििंंजग केल्यानंतर पुन्हा डाग दिसतात.

स्किन टोन लाइट करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु, या प्रोडक्ट्समुळे अनेकदा स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता वर्तविली जाते. पण जर स्किनचा लाइट टोन नैसर्गिक पद्धतींनी मिळवता आला तर मग, उत्तम आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगणार आहे. ज्यांच्या मदतीने तुम्ही डार्क स्किन टोन लाइट करू शकता…

1. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक असते, दररोज भरपूर पाणी प्यावे. शरीरामध्ये पाणी योग्य प्रमाणात असेल तर त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. तसेच स्किनही हेल्दी राहते. पाणी प्यायल्याने शरीरामध्ये विषारी तत्व बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि त्वचाही हेल्दी राहते.

2. त्वचेची निगा राखण्यासाठी नियमितपणे एक प्रॉपर चार्ट फॉलो करावा. म्हणजे, दररोज त्वचेची व्यवस्थित स्वच्छता करावी. झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करावा. फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करावा. घराबाहेर निगताना चेहरा कव्हर करावा.

3. दररोज नियमितपणे वर्कआउट केल्याने आणि पुरेशी झोप घेतल्याने त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो. व्यायाम केल्याने स्किनचे डिप पोर्स खुले होतात. तसेच आतमधील घाण बाहेर निघून जाते. त्यामुळे स्किन हेल्दी राहते तसेच ग्लो येण्यासही मदत होते.

4. स्किन टोन लाइट करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. दररोज चेहर्‍यावर लिंबाचा रस किंवा त्याची साल लावल्याने हळूहळू त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. तसेच रंग उजळतो.

5. बटाट्याची साल काढून तुकड्यांमध्ये कापून घ्यावा आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण चेहर्‍यावर 5 ते 10 मिनिटांसाठी मालिश करावा, असे केल्याने हळूहळू स्किन टोन लाइट होतो.

6. काकडीच्या तुकड्यांनी चेहर्‍यावर मालिश केल्याने चेहर्‍याचा काळपटपणा दूर होऊन चेहर्‍याची त्वचा उजळते. काकडीमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे स्किन टोन लाइट करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त हे सन टॅन दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. काकडी त्वचेसाठी नॅचरल टोनर मानलं जात आहे.