धक्कादायक ! झोपडीला आग लागल्याने 6 मुलांचा होरपळून मृत्यू, प्रचंड खळबळ

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन – कुडाच्या घराला आग लागून 6 मुलांचा जळून मृत्यू झाला आहे. बिहारमधील कावया (जि. अरारिया) गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही सर्व मुले 3 ते 6 वर्ष वयोगटातील होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांना आक्रोश अनावर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 लहान मुले कुडाच्या झोपडीमध्ये मक्याचे कणिस भाजत होते. त्यावेळी आगीची ठिणगी पसरली आणि झोपडीला आग लागली. लहान मुलांना हा प्रकार लक्षात यायला उशीर झाला. त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर पडता आले नाही. परिसरातील लोकांनी झोपडीला लागलेली आग पाहताच नियंत्रणात आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी धाव घेत मुलांचे मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.