सोलापूरमध्ये पोलीस हवालदाराचा ‘कोरोना’मुळे मृत्यु

सोलापूर  : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले महादु राठोड (वय ४४) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी  कोरोनामुळे निधन झाले. पोलीस हवालदार म्हणून ते सध्या  एमआयडिसी पोलिस  ठाणे सोलापूर येथे नेमणूकीस होते.

राठोड हे  सोलापूर पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात कर्तव्य पार पाडले होते. या पूर्वी अशोक चौकी तसेच सदर बझार पोलीस ठाण्यात ही काम पाहिले. हवालदार राठोड हे सोरेगाव जवळील बसवेश्वर तांडा येथील रहिवाशी होते. कोरोना महामारीत ही ते ड्युटीवर कार्यरत होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणी अहवालानुसार त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर पोलीस दलातील दुसऱ्या पोलीसांचा आज मृत्यू झाला आहे, या पुर्वी ही याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराचा मृत्यु झाला होता