नोकरीच्या अमिषाने पिंपरीतील सहा जणांची आर्थिक फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

नोकरीच्या अमिषाने पिंपरीमधील सहा जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महाठगांनी चांगल्या ठिकाणी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून सहा जणांना ७ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी दोनजणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांताराम विठ्ठल सपकाळ (वय-४७ रा. काळेवाडी) किशोर महावीर बस्तावडे (वय-३६ रा. शुक्रवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निशा हरजितसिंग बमरा (वय- ४० रा. गोकुळधाम सोसायटी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B0719DTQ1B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d3718bc-7928-11e8-83a2-bda2ad807e1a’]

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी नोकरी लावण्याचे अमिष फिर्य़ादी निशा यांच्यासह इतर सहा जणांना दाखवले. नोकरी लावण्यासाठी प्रत्येकांकडून काही रक्कम आरोपींनी घेतली. पैसे घेऊनही फिर्य़ादी आणि इतर सहा साक्षीदारांना नोकरी न लावता आरोपींनी ७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. पिंपरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उप निरीक्षक ए.पी. निमगीरे तपास करीत आहेत.