home page top 1

धक्‍कादायक ! शेतकर्‍यांनी ‘थेट’ जिल्हाधिकार्‍यांसमोरच प्राशन केलं ‘विष’, जिल्ह्यात सर्वत्र खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – अकोल्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. या शेतकऱ्यांचा असा आरोप केला आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबादला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. सदर सर्व शेतकरी हे बाळापूर तालुक्यातील आहे.

साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत, अर्चना टकले, आशिष हिरवकर, अबरार अहेमद रोशन अहेमद अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या सर्व शेतकऱ्यांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु या सर्व शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे अतिरीक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या समोर दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. असे समजत आहे की, या सर्व शेतकऱ्यांची शेती धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या वस्तारीकरणात गेली. बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी, शेळद आणि व्याळा गावातील हे शेतकरी आहेत.

दरम्यान महामार्गाच्या विस्तारीकरणात गेलेल्या शेतीचा मोबादला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा दोन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचे पत्र दिले. यानंतर शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन केलं. उद्याच अकोल्यात मुख्यमंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा येत आहे. दरम्यान ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like