‘सेक्स रॅकेट’ची ‘ट्विटर’वर जाहिरात, 6 उच्चशिक्षीत युवतींची सुटका, पोलिसांकडून ‘दलाल’ महिला ताब्यात

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री सेक्स रॅकेट चालविणा-या उषा दोशी (५५, रा. मीरा रोड, ठाणे) या दलाल महिलेला अटक केली आहे. ट्वीटर अ‍ॅप्लीकेशनमध्ये जाहिरात देऊन कनिष्ठ कलाकार तरुणी आणि उच्चभ्रू मॉडेल यांच्या मार्फत हजारो रुपयांच्या मोबदल्यामध्ये सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते.

पोलिसांनी बनावट कस्टमरचा सापळा रचून या महिलेचा माग काढला व तिला ताब्यात घेतले. उच्चभ्रू मॉडेल्स, चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून भूमीका करणा-या तसेच उच्चशिक्षीत तरुणींकडून एक दलाल सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या दलालाशी संपर्क साधला. तेंव्हा त्याने मीरा रोड येथील उषा या महिलेचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. तेंव्हा तिने ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळील हॉटेल साईकृपा येथे येण्यास सांगितले, याठिकाणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज, निरीक्षक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने, उपनिरीक्षक अरुण पगार, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आणि अंशिता मिसाळ आदींच्या पथकाने सापळा लावून उषाला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी सहा उच्चशिक्षीत तरुणींचीही तिच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात उषासह दोघाविरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –