Mi – 17 हेलिकॉप्टर दुर्घटनेप्रकरणी वायुसेनेच्या 6 अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा, दोघांचं होणार ‘कोर्ट मार्शल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण विभागाच्या सूत्रांनुसार माहिती देण्यात आली आहे की Mi-17 चॉपर प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल होईल आणि चार अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. हे प्रकरण Mi-17 हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) शी संबंधित आहे. ज्यात एका चूकीमुळे भारतीय वायू सेनेच्या मिसाइलने निशाणा साधला.

दोघांचे कोर्ट मार्शल, 4 जणांवर प्रशासकीय कारवाई
ही घटना 27 फेब्रुवारीला घडली. पाकिस्तानमध्ये झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी लढावू विमानाबरोबर भारताचे लढावू विमानाची डॉग फाईट सुरु होती. याच प्रकरणी एअर फोर्सच्या 6 अधिकऱ्यांवर कोर्ट मार्शल होणार आहे. यात 6 मधील 2 अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शल करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण
Mi-17 हॅलिकॉप्टर क्रॅश प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरु आहे. मागील महिन्यात एक आदेश जारी करुन श्रीनगर एअरबेसचे सीनिअर ऑफिसरची याच चौकशीचा विचार करुन ट्रान्सफर करण्यात आली. 27 फेब्रुवारीला जेव्हा भारत आणि पाकिस्तानची विमाने एक दुसऱ्यांच्या विरोधात लढत होते त्यावेळी रशिया निर्मिती एमआय -17 हॅलिकॉप्टर क्रॅश झाले आणि यात असलेले 6 लोक मृत्यू पावले.

याआधी एक दिवस आधी भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या दशहतवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला करण्यात आला. या हॅलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स देखील अजून मिळालेला नाही. वायू सेनेने यावर संशय व्यक्त केली की हा ब्लॅक बॉक्स स्थानिकांनी गहाळ केला.

वायूसेनेने स्वत: उडवले हॅलिकॉप्टर ?
पाकिस्तानची वायूसेना 27 फेब्रुवारीला काश्मीरमध्ये भारतीय सेनेला प्रतिष्ठनाला निशाणा बनवण्यात असफल ठरले. कोर्ट ऑफ इनक्वायरी अंतर्गंत काही लोकांची भूमिका तपासली जात आहे. यात ये लोक देखील होते, ज्यांच्या हातात एअर डिफेंस सिस्टमवर नियंत्रण होते. हॅलिकॉप्टर जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाइलचा निशाणा झाले होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like