अबब ! चलनाचे सर्व ‘रेकॉर्ड’ ब्रेक, ट्रक मालकाला झाला 6 लाख रूपयाचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत नवीन नियम लागू झाले आहेत. या कायद्यानुसार देशात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकणी  आतापर्यंत ओडिशामधील सर्वांत मोठे चलन कापले गेले आहे. संबलपूरमधील एका ट्रकच्या मालकास तब्बल 6,53,100 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. ओडिशा परिवहन विभागाने 7 ट्रॅफिक नियम मोडल्याबद्दल दंड आकारला आहे.

ट्रक मालक शैलेश शंकर लाल गुप्ता गेल्या 5 वर्षांपासून कर भरत नव्हते. त्याचबरोबर वाहतुकीच्या अनेक नियमांचेही  उल्लंघन करत होते.  वाहतूक विभाग (ओडिशा परिवहन विभाग) यांनी सामान्य गुन्हे, वायू आणि ध्वनी प्रदूषणाच्या मानदंडांचे उल्लंघन यासह अनेक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल  एकूण 6 लाख 53 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दिल्लीमध्ये कापले होते 2 लाखानचे चलन –

यापूर्वी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्लीत सर्वाधिक  मोठा दंड 2 लाख रुपये ठोठावण्यात आला होता. HR 69C7473 या ट्रकमध्ये 43 टन वाळू भरलेली होती. वाहतुकीच्या नियमानुसार , केवळ 25 टन भरण्याला परवानगी आहे. मात्र या नियमाबद्दल ट्रक मालक अनभिज्ञ होता. त्याला 18 टन अधिक सांगून  दोन लाख पाचशे रुपये दंड आकारण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –