6 लाख अवैध ड्रोन बनलेत देशाच्या सुरक्षेसाठी ‘घातक’, 2020 पर्यंत 700 कोटींचा होईल देशात ‘व्यापार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये ड्रोनने हत्यार सप्लाय केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या तसेच काही दिवसांपूर्वी सौदीमध्ये तेल कंपन्यांवर हल्ला करण्यासाठी देखील ड्रोनचा वापर केला गेला होता. यामुळे सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत. कारण हल्ला करण्यासाठीही आता ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

एका केंद्रीय अहवालानुसार देशात सध्या सहा लाख अवैध्य ड्रोन उडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने ड्रोन बाबत नियम बनवण्याआधी हे ड्रोन बाजारात आल्याचे समजते. तज्ञांचे म्हणणे आहे की यांची तपासणी झाली पाहिजे. देशात ड्रोनची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्र सरकारने देखील याबाबत नियमावली बनवली आहे. 2020 पर्यंत घरगुती बाजारात ड्रोनचा कारभार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढणार असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

किश्तवाड़ जेल के पास मिला ड्रोन

भारतीय विमानतळांसाठी मोठा धोका
अहवालानुसार ड्रोनमुळे विमानतळांना मोठा धोका देखील आहे. मुंबई विमानतळाच्या आसपास असे अनेक ड्रोन देखील आढळून आले आहेत. पाकिस्तानकडून असलेला धोका लक्षात घेऊन 100 विमानतळांना रेड झोनमध्ये समाविष्ठ केले आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था अलर्ट करण्यात आली आहे आणि ड्रोन हल्ल्याला उत्तर देण्याच्या अनेक यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आली आहे.

Swastik Drone-4

दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर
सौदी अरेबियात ड्रोनकडून झालेला हल्ला का काही पहिला नव्हता यावेळी देखील या ठिकाणी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर झालेला आहे. तसेच अनेक वेळा दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर झाल्याचे अनेकदा समोर आले आहे.

drone

ड्रोन विरोधी यंत्रणांवर विचार
भारत सरकारने वेग वेगळ्या ड्रोन विरोधी गोष्टींचा अवलंब करण्यासाठी परीक्षण केले आहे. इतर देशांकडून देखील ड्रोन विरोधी यंत्रणा घेण्याबाबत प्रशासन विचार करत आहे. ऑस्ट्रेलियाने बनवलेली यंत्रणा ड्रोनचा विरोध करू शकते आणि उडणाऱ्या ड्रोनची कार्यप्रणाली जाम करू शकते. या उपकरणाची काम करण्याची क्षमता दोन किलोमीटर पर्यंत आहे. ही प्रणाली साडे सात किमी वरून सुद्धा ड्रोनला नष्ट करू शकते आणि ड्रोन बाबतचा अलर्ट देखील देऊ शकते.

drone

ड्रोन पकडणे सोपेही आणि अवघडही
रडारच्या सहाय्याने ड्रोन पकडणे खूप सोप्पे आहे मात्र छोटा परंतु जमिनी लगत चालणार ड्रोन पकडणे खूप कठीण आहे यासाठी नवीन रडार यंत्राची किंवा जामरची गरज आहे. जामरने सहज ड्रोनला निष्क्रिय करता येते.

Anti-drone laser weapon

काय आहे याबाबत नियम
2018 मध्ये ड्रोन उडवण्याबाबत नियम बनवण्यात आले आहेत. 250 ग्राम पेक्षा जास्त वजनाचा ड्रोन उडवण्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. डायरेक्टोरेट ऑफ सिविल एविएशन (DGS) मध्ये याबाबतची नोंदणी देखील करावी लागणार आहे.

250 ग्रामच्या वजनाच्या ड्रोनला परवानगीची गरज नाही मात्र त्याला 50 फुटापेक्षा अधिक वर उडवत येत नाही. समारंभात ड्रोन उडवण्यासाठी परवानगी आधी स्थानिक पोलिसांना द्यावी लागते. रात्री ड्रोन उडवण्यासाठी देखील परवानगी घेणे गरजेचे आहे.

ड्रोन

ड्रोनचा प्रकार आणि वजन ?

1. नॅनो – 250 ग्रॅम पेक्षा कमी
2. मायक्रो – 250 ग्रॅम ते 2 किलोग्रॅम च्या मध्ये
3. लहान – 2 किलोग्रॅम ते 25 किलोग्रॅमच्या मध्ये
4. मीडियम – 25 किलोग्रॅम ते 150 किलोग्रॅमच्या मध्ये
5. मोठा – 150 किलोग्रॅम पेक्षा जास्त

Swastik Drone

या ठिकाणी ड्रोन दिसताच पाडण्याचे आदेश
विमानतळापाशी ड्रोन दिसताच त्याला पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यासाठी तश्या प्रकारची आधुनिक हत्यारे देखील विमानतळावर तैनाद करण्यात आलेली आहेत. तसेच विमानतळाच्या आसपास ड्रोन कार्यरत होऊ नहे यासाठी जॅमर सारख्या प्रणालींसोबतच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे.

Visit : Policenama.com