बंद घराचे कुलूप उघडले तर सापडले 6 मृतदेह; घटनेने ओडिशा हादरले

पटणागड : वृ्त्त संस्था – एका घरातून एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह बाहेर ( six-member-of-family-found-dead-in-odisha) काढण्यात आले. मृतामध्ये 4 मुलांचा समावेश आहे. ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यातील पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक लोकांनी बरेच दिवस घर आतून बंद असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट (police-investigation-for-murder-or-suicide) झाले नाही. या घटनेने ओडिसा हादरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (50), त्यांची पत्नी ज्योती (48) आणि त्यांची दोन मुले आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते 12 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल.

प्रभारी निरीक्षक प्रियंका राऊत म्हणाल्या की, खू न की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराचा शोध घेतला जात असून, घटनेची कारणे शोधली जात आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी बरेच दिवस घर आतून बंद असल्याचे सांगितल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. काहींनी घर उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र घर लॉक असल्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातच 6 मृतदेह आढळून आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोरंजन प्रधान म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.