मराठवाड्याला 6 मंत्री पद, ‘या’ दिग्गज नेत्यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अखेर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले आहे. आणि अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला सहा मंत्रिपद मिळाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. राष्ट्रवादीनं अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. विशेषत: धनंजय मुंडे प्रथमच मंत्रिमंडळात दिसणार आहेत.

व तसेच काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. दुसरीकडे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. अखेर मराठवाड्याला सहा मंत्री पद मिळाली आहेत.

शपथ घेणारे मंत्री :
कॅबिनेट मंत्री :
अशोक चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
वर्षा गायकवाड
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
सुनील केदार
संजय राठोड
गुलाबराव पाटील
अमित देशमुख
दादा भुसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
बाळासाहेब पाटील
यशोमती ठाकूर
अनिल परब
उदय सामंत
के. सी. पाडवी
शंकरराव गडाख
अस्लम शेख
आदित्य ठाकरे

राज्यमंत्री :
अब्दुल सत्तार
सतेज पाटील
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
विश्वजीत कदम
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील येड्रावकर

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/