राँग साइडने वाहन चालविल्यास सहा महिन्यांची कैद : आयुक्त पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वपरीने कार्यरत झालेली आहे. त्यातूनच पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना आदेश दिले आहेत. ‘राँग साइड’ने वाहन चालविल्यास यापुढे थेट सहा महिन्यांची साधी कैद होईल किंवा एक हजार रुपये दंड अशा प्रकारचे गुन्हे संबंधितांवर दाखल करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.  मंगळवारी (११ सप्टेंबर) सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e194bcd4-b645-11e8-ac4f-6b584925052c’]
पिंपरी-चिंचववड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यावर आयुक्त पद्मनाभन यांनी सर्व प्रथम येथील वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीवर तोडगा काढण्यास सुरवात केली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून हिंजवडी आयटी पार्कमध्ये चक्राकार एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील ऑटोहब चाकण साठी ट्रॅफिकचा अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोंडी सोडविण्याबरोबरच आता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात करण्यात आली आहे. पहिल्यांदा कार राँग साइडने नेणाऱ्यांवर लगेचच सहा महिन्यांची कैद आणि एक हजार रुपये दंड किंवा केवळ सहा महिन्यांची कैद अथवा दोन्ही दंड एकत्रित अशा प्रकारे गुन्हे दाखल होणार आहेत. तर दुचाकीस्वारांवर सुरवातीला आर्थिक दंडाची तरतूद असलेल्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर परत तीच दुचाकी राँग साईडने येताना आढळल्यास त्यावर कार प्रमाणे सहा महिन्यांची कैद असलेल्या गुन्ह्यांची नोंद होणार आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7e42f60-b645-11e8-89eb-59668f99c201′]

पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून तळेगाव दाभाडे – ३, देहूरोड – १, हिंजवडी – २, वाकड – १, सांगवी – १, पिंपरी – ७, चिंचवड, निगडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी या पोलिस ठाण्यांमध्ये एकूण ४ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

काहीही झाले तरी आगामी निवडणुका आम्हीच जिंकणार : अमित शाह