वाहन चालकांना लुटणारे 6 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या महामार्ग पोलीस चौकीबाबात मागील अनेक दिवसांपासून तक्रारी वरिष्ठ कार्यालयात आल्या आहेत. अनेकवेळा पाठलाग करून चालकाला बेदम मारहाण करून त्याला तपासणीच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्गावरील पोलीस चौकशीच्या नावाखाली लुटमारी करत असल्याची तक्रार एका व्यक्तीने पुराव्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. याच तक्रारीवरून नांदेड ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या वसमत फाटा येथील महामार्ग पोलीस चौकीच्या सहा पोलिसांना रविवारी (दि.११) रात्री निलंबीत केले.

पोलीस चौकीच्या ६ पोलिसांना निलंबीत केले मात्र, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा पोलीस अधिकारी वरिष्ठांनी मोकळा सोडल्याने पोलिसांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावर चौकशीच्या आणि तपासणीच्या नावाखाली पोलीस लुटमारी करत असल्याची तक्रार सुभाशीष कामेवार यांनी केली. तसेच त्याचे पुरावे देखील सादर केले होते. महामार्गावरील असे प्रकार थांबले नाहीत तर आत्मदहन करण्याचा ईशारा त्यांनी दिला होता.

यावरून पोलीस अधीक्षक संजय शेत्रे यांनी विजय सुर्य़वंशी, दिपक जाधव, आबाजी खोमणे, गणेश लोसरवार, गोविंद मुंडे आणि ईश्वर राठोड यांना निलंबीत केले. चौकी तपासणी-चौकी नसुन फक्त या ठिकाणी वाहन चालकांना लुटण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी आपला मार्ग बदलल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे चौकशी आणि तपासणीच्या नावाखाली लुटणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like