Six Red Snooker Tournament | सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत पिनाक बॅनर्जी, आशिष थोरात यांना विजेतेपद !!

पुणे : रोड हाऊस स्नुकर क्लब (Road House Snooker Club) तर्फे आयोजित सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत (Six Red Snooker Tournament) पिनाक बॅनर्जी आणि आशिष थोरात यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करून आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले. (Six Red Snooker Tournament)

येरवडा येथील स्नुकर क्लब येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण ६४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अ गटामध्ये प्रोफेशनल ३२ खेळाडू व ब गटामध्ये नवशिके आणि हौशी असे ३२ खेळाडू अशा पध्दतीने या खेळाडूंची विभागणी करण्यात आली होती. अ गटाच्या अंतिम सामन्यात पिनाक बॅनर्जी याने बलराज सिंग याचा ५५-२०, ३०-४५, ४०-३९, ५८-२९, ४९-५२, ४८-५८, ३५-३३ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत पिनाक बॅनर्जी याने सैफ पटेल याचा ३-२ असा तर, बलराज सिंग याने राज अगरवाल याचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. (Six Red Snooker Tournament)

ब गटाच्या अंतिम सामन्यात आशिष थोरात याने माजिद शेख याचा ३५-१५, २२-४९, २९-१८, ३८-२८, १५-३८, ३९-२९ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत आशिष थोरात याने विग्नेश कोरबाळू याचा ३-१ असा तर, माजिद शेख याने संकेत कांबळे याचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेवक अजयदादा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. अ गटातील विजेत्या पिनाक बॅनर्जी याला करंडक आणि १० हजार रूपये तर, उपविजेत्या बलराज सिंग याला करंडक आणि ५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. ब गटातील विजेत्या आशिष थोरात याला करंडक आणि ५ हजार रूपये तर, उपविजेत्या माजिद शेख याला करंडक आणि अडीच हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गट अः
उपांत्य फेरीः पिनाक बॅनर्जी वि.वि. सैफ पटेल ३-२ (४५-३४, ५६-४३, ३६-५१, २९-५८, ५२-३४);
बलराज सिंग वि.वि. राज अगरवाल ३-२ (४६-५७, ४९-३४, ५५-३२, ३४-५६, ५३-३१);
अंतिम सामनाः पिनाक बॅनर्जी वि.वि. बलराज सिंग ४-३ (५५-२०, ३०-४५, ४०-३९, ५८-२९, ४९-५२, ४८-५८, ३५-३३);

गट बः (हौशी खेळाडू) :
उपांत्य फेरीः आशिष थोरात वि.वि. विग्नेश कोरबाळू ३-१ (३४-२१, २१-४४, ५६-३२, ४५-१९);
माजिद शेख वि.वि. संकेत कांबळे ३-२ (४५-२१, १८-३४, २२-४३, ५६-११, ५२-२३);
अंतिम सामनाः आशिष थोरात वि.वि. माजिद शेख ४-२ (३५-१५, २२-४९, २९-१८, ३८-२८, १५-३८, ३९-२९);

Web Title :- Six Red Snooker Tournament | Pinak Banerjee, Ashish Thorat win Six Red Snooker Tournament !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील