Solapur News : पोलिसांची कारवाई ! 6 वाळू माफिया पंढरपूर तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक गुन्हेगार झटपट श्रीमंत होण्यासाठी वाळूकडे वळत आहेत. यामुळे गुन्हेगारीत अजूनच भर पडत आहे. दरम्यान, पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातून अनेक वाळू माफिया अवैध वाळू उपसा करतात. गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी सहा वाळू माफियांना पंढरपूर तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले असल्याचे पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं.

शहरातील सुरज विष्णू पवार ( रा. जुनी वडार गल्ली) महादेव बाळू काळे ( रा. जुनी वडार गल्ली), राजू उर्फ रामा तिम्मा बंदपट्टे ( रा. संतपेठ), लहू बाबू चव्हाण (रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, पंढरपूर) तर ग्रामीण भागातील नागेश शिवाजी घोडके (रा. बोहाळी ,तालुका पंढरपूर) व ऋतिक उर्फ दादा अरुण लामकाने ( रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) हे वारंवार वाळू चोरीचे गुन्हे करणारे सराईत आरोपी आहेत. यांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करावे असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला आहे. वरील सहा जणांना आजपासून पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे असं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं.