6 पोलिस अधीक्षक, उपायुक्‍त, उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) पोलिस दलातील 6 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार्‍यांच्या बदलीबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली याबाबत पुढील प्रमाणे.

श्रीमती स्मार्तना पाटील (उपायुक्‍त, ठाणे शहर ते अधीक्षक, बिनतारी संदेश, पुणे), पी.आर. पाटील (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, कोल्हापूर), वैशाली ईश्‍वर कडुकर (अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, कोल्हापूर ते उपायुक्‍त, सोलापूर शहर), राहुल उत्‍तम श्रीरामे (उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग ते अप्पर नियंत्रक, नागरी संरक्षण), यशवंत रघुनाथ केडगे ( उप अधीक्षक – मुख्यालय, वाशीम ते उपविभागीय अधिकारी, मंगळूरपीर, वाशीम) आणि सोमनाथ व्दारकानाथ तांबे (उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे, अमरावती ग्रामीण).

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like