Pune : सार्वजनिक सेवा आणि उपक्रमातील 1 लाख 57 हजार ग्राहकांमुळं महावितरण अडचणीत, 6 हजार 507 कोटींची थकबाकी

पिंपरी चिंचवड : पोलिसनामा ऑनलाईन – थकबाकीमुळे महावितरण अडचणीत आल्याचे चित्र दिसत आहे. थकबाकीदारांमध्ये केवळ सामांन्य ग्राहकच नाही तर स्थनिक स्वराज्य संस्थांचा देखील यात समावेश आहे. एप्रिलपासून एकदाही बिल न भरलेल्या एकूण थकबाकीमध्ये ६० टक्के थकबाकी ही स्थानिक स्वराज संस्थांची आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन झालं त्यामुळे महापालीका आणि नगरपालिकांच्या करांमध्ये मोठी घट झाली. त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांबरोबर सार्वजनिक आस्थपनानादेखील वीज बिल भरता आले नाही. सार्वजनिक सेवा आणि उपक्रमातील १ लाख ५७ हजार ग्राहकांकडे ६ हजार ५०७ कोटी थकीत आहेत. यामध्ये पथदीप, सार्वजनिक पाणी पुरवठा आणि सार्वजनिक सेवा घेणाऱ्या ग्राहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर शासकीय निवासस्थान, शासकीय कार्यालये, इतर सार्वजनिक सेवांची थकबाकी मोट्या प्रमाणात आहे.

स्थानिक कार्यालयना भेट देऊन थकबाकी भरण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.
एप्रिल- ऑक्टबर पर्यंत एकदाही बिल न भरलेल्या सार्वजनिक संस्था

ग्राहक संख्या थकबाकी
पथदीप
७००२३ ५०९१. ३

सार्वजनिक पाणी पुरवठा
३८५८६ १३४७

सार्वजनिक सेवा
५०३४७ ६९.४

एकूण
१५८९५६ ६५०७.७