दिल्‍लीतील ‘आश्‍चर्य’ बनलं ‘हे’ 6 गजाचं घर, संपुर्ण कुटूंबिय वास्तव्यास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हे छोटेसे घर लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. बुरारी परिसरात बांधलेल्या सहा यार्डांचे हे छोटे घर पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येत आहेत. जवळपासचे लोक असेही म्हणतात की हे घर खूप लोकप्रिय झाले आहे. येथे येणारे लोक याची छायाचित्रे घेतात.

खास गोष्ट म्हणजे या घरात बेडरूम, एक स्वयंपाकघर, स्नानगृह, जिना आणि टेरेस आहे. हे अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की तळमजल्यावर एक शिडी आणि स्नानगृह आहे. येथून चढताना पहिल्या मजल्यावर एक बेडरूम आहे. दुसऱ्या मजल्यावर एक स्वयंपाकघर आणि नंतर मोकळी गच्ची आहे.

या घरात राहणारी पिंकी सांगते की हे घर अतिशय सुंदर पद्धतीने बनविण्यात आलं आहे. हे फक्त सहा यार्डमध्ये बनवले गेले आहे. संपूर्ण घरात मार्बल टाकण्यात आलेले आहे. या घरात ती, नवरा आणि दोन मुलांसह राहते. संपूर्ण कुटुंबाला इतक्या लहान घरात राहण्यात काहीच अडचण नाही. या घराचे भाडे दरमहा 3500 रुपये आहे. पिंकी सांगते की हे घर जरी लहान असले तरी ते लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्याच वेळी, लोक यात आश्चर्यचकित आहेत की या घरात चार लोक कसे राहतात.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like