पत्नीच्या पाठपुराव्याला यश, फौजदार दत्तू सरनोबत यांचा शहिदांच्या यादीत समावेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईमधील खेरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू आप्पा सरनोबत यांच्या पत्नीला त्यांच्या मृत्यूनंतर अखेर सहा वर्षांनी न्याय मिळाला आहे. वाहनचोरांना पकडताना झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीने दत्तू यांना शाहिदाचा दर्जा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपणामुळे त्यांना यासाठी ६ वर्ष वाट पाहावी लागली.

सहा वर्षांपूर्वी वांद्रे परिसरात ते रात्रीच्या गस्तीवर होते. यावेळी पहाटे साडेतीनच्या सुमारास एक कारचालक लघुशंकेसाठी आपल्या गाडीतून उतरला असता काही लुटारूंनी त्याला अडवून त्याची गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तू सरनोबत यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या लुटारूंनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र १५ दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मात्र अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांचा समावेश शहिदांच्या यादीत करण्यात आला नव्हता. त्यांच्या पत्नी कविता यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांनी या यादीत आपल्या पतीचे नाव समाविष्ट व्हावे यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर देखील त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. याचदरम्यान वाहतूक पोलीस शिपाई विलास शिंदे यांचा देखील अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यासाठी पाठपुरवठा सुरु केला. त्यानंतर शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि शेवटी पोलीस महासंचालकांनी त्यांचे नाव शहिदांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर कविता या आपल्या दोन मुलांसह अंधेरीमध्ये राहतात. एक मुलगा सध्या पोलीस दलात आहेत तर एक मुलगा एका खासगी कंपनीत काम करतो.

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

Loading...
You might also like