दुर्देवी घटना : स्कूल व्हॅनच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यू

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्कूल व्हॅनच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गायत्री हंगे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. गायत्री ही लातूरमधील आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये शिकते. हरी जात असताना तिला स्कूल व्हॅनची धडक बसली यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हंगे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळली आहे. गायत्रीच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

किणगावमध्ये राहणारी गायत्री शाळा सुटल्यानंतर स्कूल व्हॅनमधून घरी आली. गाडीतून उतरल्यानंतर ती कोणत्या बाजून घरात जात असल्याचे चालकाला समजले नाही. त्यामुळे त्याने गाडी पुढे घेताना गायत्रीला धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गायत्रीला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू रात्री उशीरा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या नातेवाकइकांकडे देण्यात आला. आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हसमुख आणि सुंदर असलेल्या गायत्रीच्या अचानक जाण्याने तिच्या आई-वडीलांना मानसिक धक्का बसला आहे. दहा दिवसांपूर्वीच तिची शाळा सुरु झाली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like