भारतात स्मार्टवॉच Falster 3 लॉन्च, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक कंपनी स्कागेन ने आपले खास स्मार्टवॉच फाल्स्टर- 3 भारतात लॉन्च केले आहे. यामध्ये गुगल असिस्टंट, कॉलिंग साठी स्पीकर आणि १ जीबी रॅम चा सपोर्ट असणारे वॉच ग्राहकांना आता वापरता येणार आहे. हे वॉच सॅमसंग च्या स्मार्टवॉच गॅलॅक्सि ला जोरदार टक्कर देऊ शकते.

स्मार्टवॉच फाल्स्टर- 3 ची किंमत
या वॉचची किंमत ही २१ हजार ९९५ रुपये इतकी असून, युजर्सना हे वॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि ऑफलाईन स्टोअर्सवरून खरेदी करता येईल.

स्मार्टवॉच फाल्स्टर- 3 ची वैशिष्ट्ये
या वॉचमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली असून, एकदा चार्जिंग केले की ती बॅटरी २४ तास चालू राहते. या वॉचमध्ये नोटिफिकेशन, गुगल असिस्टेंट, अलार्म आणि प्ले म्युझीकचे सपोर्ट मिळणार आहे. ही वॉच लेटेस्ट अँड्रॉयड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते.

सॅमसंग च्या वॉच ला टक्कर
सॅमसंग ने त्यांचे वॉच हे ऑक्टोबर महिन्यात लॉन्च केले होते. या वॉचमध्ये १.३ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला असून, यामध्ये ३६०*३६० असे पिक्सलचे रिझोल्युशन आहे. या वॉचमध्ये सॅमसंग अक्सिनॉस ९११० प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे.