Video : मोटीवेशनल ! ‘भाईजान’ सलमानच्या खास चाहत्याने पायाने बनवलं त्याचं ‘स्केच’ ; सलमानने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अशातच सलमान खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोत एक सोशल मीडिया फॅन सलमानचं स्केच बनवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ खूपच मोटीवेट करणारा आहे.

सलमानची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. चाहत्यांचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. चाहते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. सलमानही त्याच्या चाहत्यांना प्रेम देताना आणि आदर देताना मागे हटत नाही. अशातच सलमानने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, एक अपंग फॅन त्याचं स्केच बनवत आहे. चकित करणारी बाब अशी की, ही चाहती हाताने नाही तर पायाने हे स्केच बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप प्रेरणादायक असा आहे.

सलमान खानने हा व्हिडीओ 16 जुलै रोजी रात्री पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले आहे की, “भगवान भलं करो. प्रार्थना आणि खूप सारं प्रेम.” व्हिडीओत दिसत आहे की, पेंटींगच्या बाजूला एक मोबाईल आहे. ज्यातील फोटो पाहून या चाहतीने हे स्केच बनवलं आहे.

सलमान खानचा भारत सिनेमा खूप हिट झाला. यानंतर सलमान खान सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असल्याचे दिसत आहे. चाहत्यांसाठी तो नेहमीच फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like