Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Skin Allergy Causes And Treatment | त्वचेच्या अ‍ॅलर्जीचा (Skin Allergy) धोका उन्हाळ्यात अधिकच वाढतो. त्वचेवरील ही अ‍ॅलर्जी सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण किंवा कॉस्मेटिक उत्पादने इत्यादी कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकते (Summer Care Tips). जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती बाह्य जीवाणूंविरुद्ध प्रतिक्रिया देते तेव्हा त्वचेची अ‍ॅलर्जी उद्भवते. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते आणि त्यांची अ‍ॅलर्जीही वेगवेगळी असते (Skin Allergy Causes And Treatment).

 

उन्हाळ्यात तीव्र ऊन आणि वाढलेल्या तापमानामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी होते. यामुळे त्वचेत खाज सुटणे, चिडचिड, लालसरपणा किंवा पुरळ होऊ शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, अशा समस्या टाळण्यासाठी अ‍ॅलर्जीचा संपर्क मर्यादित करणे किंवा टाळणे हे सर्वात प्रभावी मानले जाते (Skin Allergy Causes And Treatment). यासाठी सर्वप्रथम तुमच्या अ‍ॅलर्जीचे मुख्य घटक कोणते आहेत, हे समजून घ्यावं लागेल?

 

सर्वसाधारणपणे त्वचेच्या अ‍ॅलर्जीची समस्या आपोआप किंवा काही हलक्या औषधांनी-क्रीमने बरी होते. यासाठी काही घरगुती उपायही खूप प्रभावी असल्याचं तज्ज्ञ मानतात, ज्याचा उपयोग त्वचेची अ‍ॅलर्जी टाळण्यासाठीच होऊ शकतो असं नाही, तर अ‍ॅलर्जी असेल तर तो सहज बरा होऊ शकतो. अशाच काही उपायांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.

 

कोरफडचा वापर (Aloe vera) :
कोरफड हे एक अतिशय प्रभावी औषध आहे जे प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे, ज्याचे विविध प्रकारचे आरोग्य फायदे आहेत. मधुमेह आणि पोटाच्या आजारांचा धोका कमी करण्याबरोबरच कोरफड त्वचेच्या समस्यांमध्येही खूप प्रभावी आहे. कोरफडीचे जेल त्वचेवर लावल्याने पेशींचे पोषण होते आणि ते विषाणूंविरुद्ध सहज प्रतिक्रिया देण्यास सक्षम असतात. कोरफड जेल त्वचेवर लावल्यास अ‍ॅलर्जीची समस्या दूर होऊ शकते (Home Remedies For Skin Allergy In Summer).

नारळ तेल (Coconut Oil) :
अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांमध्ये खोबरेल तेलाचा वापर विशेषतः फायदेशीर मानला जातो. नारळाचे तेल लावल्याने अ‍ॅलर्जीच्या समस्या कमी होण्यासही फायदा होतो. त्वचा मऊ करणे, रुक्षपणा आणि खाज सुटणे कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. नारळाचे तेल जळजळ कमी करून संक्रमण किंवा अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. त्वचेच्या अ‍ॅलर्जीच्या समस्येमध्ये नारळाचं तेल लावून काही काळ तसंच राहू द्या, यामुळे खूप फायदे मिळतात.

 

सफरचंद व्हिनेगर (Apple Cider Vinegar) :
त्वचेची अ‍ॅलर्जी कधीकधी बॅक्टेरिया किंवा विषाणूंच्या संपर्कामुळे देखील होऊ शकते, अशा परिस्थितीत त्वचेवर तीव्र खाज सुटणे आणि पुरळ येते. या समस्या टाळण्यासाठी सफरचंद व्हिनेगर लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे त्वचेची पीएच पातळी संतुलित करते जेणे करून रोगप्रतिकारक शक्ती रोगजनकांचा सहज सामना करू शकेल. लक्षात ठेवा की त्वचेवर सफरचंद व्हिनेगर लावण्यापूर्वी, ते पाण्यात मिसळा आणि पातळ करा, अन्यथा यामुळे चिडचिड होऊ शकते.

आईस थेरपी (Ice Therapy) :
त्वचेच्या अ‍ॅलर्जीमुळे एक्जिमा किंवा काटेरी पुरळ उठतात. ही समस्या टाळण्यासाठी १०-१५ मिनिटं आइस पॅकसह शेकणं फायद्याचं ठरतं.
यामुळे त्वचा सुन्न होते. त्वचेची विषाक्तता कमी करण्यासाठी आईस थेरपी देखील आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
खाज सुटण्यापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी हा उपाय आपल्यासाठी खुप उपयुक्त ठरू शकतो.
प्रत्येकाची त्वचा आणि त्याच्या संवेदनशीलतेची पातळी वेगवेगळी असते, अशा पद्धतीने ज्या उपायाचा कुणाला फायदा झाला आहे,
तो उपायही तुम्हाला मिळणं गरजेचं नाही. कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Skin Allergy Causes And Treatment | skin allergy causes and treatment home remedies for skin allergy in summer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या

 

Joint Pain | म्हातारपणा येण्यापुर्वीच कशामुळे होतो ‘या’ पध्दतीचा सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या त्याचे संकेत

 

Mobile Phone Addiction | तुमच्याही मुलाला मोबाईलचे ‘व्यसन’ लागले असेल तर करा ‘या’ गोष्टी; तात्काळ सवय सुटेल, जा