त्वचा आणि केसांसाठी होतो मोहरीच्या बियांचा फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मोहरीच्या बियांचा वापर पदार्थांना तडका देण्यासाठी केला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की, मोहरीच्या बियांनी त्वचा चमकदार करता येते. मोहरीचे तेल त्वचा तरुण करण्यासोबतच ग्लोईंगही करते. ड्राय स्कीन असलेल्यांसाठी मोहरीच्या बीया रामबाण उपाय ठरतात. तसेच मोहरीच्या बियांचा बायबल आणि हिंदू पुराणांमध्ये सुद्धा संदर्भ आढळून येतो. त्यामुळे मोहरीच्या तेलाचा आणि बियांचा वापर पूर्वीच्या काळापासून झालेला दिसून येतो. चला तर मग जाणून घेऊया आणखी काही फायदे…

१. नैसर्गिक स्क्रब

मोहरीच्या बीया एकप्रकारे नैसर्गिक स्क्रबप्रमाणे काम करतात. मोहरीच्या बियांसोबत, लॅवेंडर आणि गुलाब असेंशिअलचे काही थेंब टाकून एक स्क्रब तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करुन तुम्ही त्वचेवरील मृत त्वचा दूर करु शकता.

२. हायड्रेट त्वचा

मोहरींच्या बियांची पावडर करुन त्यामध्ये अॅलोवेरा जेल मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा. त्याने चेहरा हायड्रेट राहतो. तसेच चेहरा स्वच्छ होतो आणि चमकदार दिसतो.

३. अँटी-एजिंग

मोहरीच्या बियांत कॅरोटीन आणि ल्युटीन आढळून येत. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असते. सर्व पोषक तत्वे एक चांगले अँटी-ऑक्सिडेंट तयार करतात. त्यामुळे हे सर्वच तत्व एका अँटी-एजिंगप्रमाणे काम करते. त्याने त्वचा तरुण दिसते.

४. केसांची वाढ

मोहरीच्या बियांतून काढलेल्या तेलात व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असते. केसांच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए फायदेशीर असते. त्यामध्ये केसांची वाढ वेगाने करण्याचे गुण आढळतात.

५. इन्फेक्शनपासून दूर

मोहरीच्या बियात सल्फर हे तत्व आढळून येत. त्यात अँटी-फंगल गुण असतात, जे चेहऱ्यावर होणाऱ्या संक्रमणाला दूर ठेवण्यासाठी मदत करतात.