Skin Cancer Symptoms | तुमचे डोळेही देतात कॅन्सरचे संकेत, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Skin Cancer Symptoms | कर्करोग (Cancer) हा वेगाने वाढणारा सर्वात प्राणघातक आजार आहे. जगभरात जेवढे मृत्यू (Death) होतात, त्यातील सर्वात जास्त मृत्यू कर्करोगाने होतात. २०२० मध्ये सुमारे १० दशलक्ष मृत्यू किंवा सहापैकी एका मृत्यूसाठी हा आजार एक प्रमुख कारण ठरला असल्याचे आढळले आहे. कर्करोग हा भारतातही सर्वात जास्त पसरलेला आजार आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या (International Agency For Research On Cancer) अहवालानुसार, २०१८ मध्ये भारतात सुमारे ७.८४ लाख लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जागतिक कर्करोगाच्या मृत्यूंपैकी ८% आणि भारतातील सर्व कारणांमुळे होणार्‍या मृत्यूंपैकी ६% आहे (Skin Cancer Symptoms).

 

स्तन, फुफ्फुस, गुदाशय आणि प्रोस्टेट कर्करोग (Breast, Lung, Rectal And Prostate Cancer) हे कर्करोगाचे प्रकार सर्वसाधारण आहेत. अलिकडच्या काही वर्षांत त्वचेच्या कर्करोगाचेही (Skin Cancer) प्रमाण वेगाने वाढत असल्याचर नोंद होत आहे. त्याची लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू झाले तर त्यामुळे रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता असते. त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे त्वचेव्यतिरिक्त आपल्या डोळ्यांमध्ये देखील दिसू शकतात. याआधारे वेळीच आजाराचे निदान सहज होऊ शकते (Skin Cancer Symptoms).

 

डोळे दाखवतात कॅन्सरची लक्षणं (Eyes Show Symptoms Of Cancer) –
सर्वसाधारणपणे पेशींची असामान्य वाढ हे कर्करोगाचे कारण मानलं जातं. जे लोकांना सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण आणि रसायनांच्या अधिक संपर्कात येतात त्यांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका (Risk Of Skin Cancer) जास्त असू शकतो. त्वचेच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शरीरावर चट्टे पडतात आणि कालांतराने ते तीव्र होतात. याशिवाय डोळ्यांच्या पापण्यांमध्ये आणि डोळ्यांमध्ये त्वचेच्या कर्करोगाची काही लक्षणंही दिसतात.

 

अभ्यासातील निष्कर्ष (What Did The Study Find) –
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (एनईजेएम) या आरोग्य नियतकालिकाच्या अहवालात त्वचेचा कर्करोग डोळ्यांद्वारे शोधला जाऊ शकतो. एका ४७ वर्षीय महिलेला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ डोळे खाजवत होते. निदान करताना डॉक्टरांना तिची पापणी बाहेर पडल्याचे आढळून आले. त्यांच्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असलेले फुगे दिसले. तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेच्या फिलेब्रल कंजंक्टिवामध्ये (Palpebral Conjunctiva) प्राणघातक त्वचेच्या कर्करोगाच्या समस्येचे निदान केले.

डोळ्यांतील बदलांकडे लक्ष ठेवा (Notice Changes In The Eyes) –
कोलंबिया डिपार्टमेंट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या तज्ञांच्या मते, सतत टिकून राहणे आणि डोळ्यातील काही समस्या बरे न होणे हे डोळ्याच्या मेलेनोमाचे लक्षण असू शकते, ज्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

 

डोळ्यांमध्ये पाणी येणे, काही परिस्थितीत त्यातून रक्तस्राव होणे.

डोळ्यांच्या त्वचेचे खडबडीत, खवले, तपकिरी आणि लाल डाग.

एक गुळगुळीत, मोत्यासारखा, कडक आणि लाल फुगवटा.

डोळ्यांत वाढणारं मांस आदी लक्षणे ही त्वचेच्या कर्करोगाची आहेत.

 

डोळ्यांची सतत काळजी घ्या (Take Care Of Eyes Constantly) –
महिलेने उपचार सुरू केल्याच्या एका आठवड्यानंतर तपकिरी पॅचेसमध्ये वाढ झालेली नाही. यामुळे हे स्पष्ट होते की जर या स्थितीचे वेळीच निदान झाले तर रोगाची प्रगती होण्यापासून रोखता येऊ शकते. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या असामान्य बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आपल्याला कर्करोगाचा अनुवांशिक धोका (Cancer Genetic Risk) असल्यास, आपल्याला लक्षणांबद्दल अधिक सतर्क असणे आवश्यक आहे, असा सल्ला कोलंबिया डिपार्टमेंट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीच्या तज्ज्ञांनी (Columbia Department Of Ophthalmology) दिला आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skin Cancer Symptoms | signs of skin cancer in the eyes eyelid cancer symptoms and prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anxiety Relief Tips | तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास पाणी सुद्धा कमी करते अस्वस्थता आणि चिंता?

 

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

 

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’