Skin Care Tips | अचानक आलेल्या पिंपल्समुळं झालेत हैराण? करा ‘हे’ घरगुती उपयुक्त उपाय…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेक लोकांना चेहऱ्यावरील पिंपल्सच्या (Skin Care Tips) समस्यांना सामोरं जावं लागतं. पिंपल्सच्या समस्येमुळे (Pimples Problem) असंतुलन यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते (Skin Care Tips).
पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादने (Face Chemical Products) उपलब्ध आहेत. परंतु त्याची किंमत अधिक असल्यानं सगळ्यांनाच ते परवडत नाही (Skin Care Tips). परंतु तुम्हाला माहिती आहे का? घरात ठेवलेल्या काही गोष्टी आपल्या कामी येऊ शकतात आणि आपण या पिंपल्स पासून सुटका मिळवू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात काही घरगुती उपाय ज्यामुळे तुमची पिंपल्स पासून सुटका होईल (Amazing Home Remedies To Get Clear Glowing And Pimple Free Skin).
बर्फ (Ice Cube) –
बर्फ पिंपल्स आणि मुरुमांचा लालसरपणा कमी करतो. तसेच बर्फामुळे पिंपल्सची सूज देखील कमी होते (Ice For Pimples). त्यामुळे आपली चिडचिड सुद्धा कमी होते. एका कपड्यांमध्ये दोन किंवा तीन बर्फाचे तुकडे घ्या आणि चेहऱ्यावर तो कपडा फिरवा. यानं पिंपल्सवर फरक पडतो.
कडुलिंबाची पाने (Neem Leaves) –
कडुलिंबाची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स पुरळ आणि मुरूम (Pimples, Acne) या समस्यांपासून आराम मिळतो.
वाफ (Steam) –
वाफ घेतल्यानं त्वचेचे छिद्र उघडतात आणि त्वचेला श्वास घेणं सोपं होतं. त्यामुळे त्याच्यावर घाण बसत नाही आणि पिंपल्यच्या समस्येपासून मुक्ती मिळते (Steam Good For Skin).
लसुन (Garlic) –
लसणामध्ये अँटीव्हायरस (Antivirus), अँटीफंगल (Anti Fungal), अँटीसेप्टीक (Anti Septic) आणि अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आढळतात.
ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.
यासाठी लसणाची एक कडी घेऊन मुरुमावर लावा आणि नंतर पाच ते सात मिनिटं झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
योग्य आहार (Healthy Diet) –
जास्त तेलकट किंवा तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर गंभीर परिणाम होतो (Oily Food).
त्यामुळे निरोगी अन्न खा (Healthy Food) आणि हिरव्या भाज्या आणि फळे नियमित आपल्या आहारात ठेवावे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Skin Care Tips | amazing home remedies to get clear glowing and pimple free skin
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Malaria | फुफ्फुस-लिव्हर वाईट प्रकारे डॅमेज करू शकतो मलेरिया, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव