शॉवरबाथ घेता ? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठीच

पोलिसनामा ऑनलाईन टीम- शॉवरबाथ घेतल्यानंतर लगेच नाइट क्रीम आणि सिरम लावल्याने ते त्वचेत चांगल्या प्रकारे शोषले जाते. रात्री झोपण्याआधी शॉवर घेतल्यास तेथेच मेकअपही काढता येऊ शकतो. थोड्या कोमट पाण्याने त्वचेची आतपर्यंत स्वच्छता होते. शरीर व चेहऱ्यावर मॉइस्चरायजर लावण्यासाठी शॉवर ही सर्वात चांगली वेळ आहे. तज्ज्ञ सांगतात की, अंघोळीनंतर लगेचच लोशन आणि मॉइस्चरायजर लावल्याने त्वचेचे हायड्रेशन वाढते. मॉइस्चरायजर लावण्यास उशीर केल्यास तुम्ही त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी करता, त्यामुळे त्वचा कोरडी जाणवते.

असे मानले जाते की, शॅम्पू, क्लेंजर्स आणि बॉडी वॉश कोमट पाण्यासोबत सर्वात जास्त परिणामकारक ठरतात. पाणी जास्त गरम नसावे कारण त्यामुळे त्वचेच्या वरच्या भागाचे नुकसान होते. हा वरचा भाग निघाला तर त्वचेवर कुठल्याही फ्रेगरन्स प्रॉडक्टची प्रतिक्रिया होऊ शकते. संवेदनशील किंवा कोरडी त्वचा असेल तर कोरफड किंवा व्हिटॅमिन बी ५ असलेल्या प्रॉडक्ट्सचा वापर शॉवरबाथ घेताना करावा. अशी प्रॉडक्टस त्वचेसाठी सुरक्षित असतात. शॉवरमध्ये ती वापरल्यानंतरही त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होत नाही. घाम आणि सनस्क्रीन हटवण्यासाठी जेंटल क्लेंजर आणि सोप-फ्री वॉशचा वापर करता येईल. त्यामुळे त्वचेची इचिंगची तक्रार राहणार नाही. हे माइल्ड क्लेंजर्स शरीराची स्वच्छता बॉडीवॉश आणि साबणाप्रमाणेच करतात. फक्त हे माइल्ड क्लेंजर्स त्वचेतील मॉइश्चर कायम ठेवतात, आवश्यक तेलही कायम ठेवतात.