दह्याच्या फेशियलचे होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे ! जाणून घ्या तयार करण्याची आणि लावण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दह्यात अनेक पोषक घटक असल्यानं याचे आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. अनेकजण स्किन केअर रूटीनमध्ये याचा वापर करतात. आज आपण दह्यापासून फेशियल करण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

अनेकांना माहित नसेल परंतु दद्यात लॅक्टीक अॅसिड असतं. यामुळं मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यासाठी फायदा होते. याशिवाय यातील फॅटी अॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजे या घटकांमुळं त्वचा निरोगी राहते. नैसर्गिक वस्तूंचा वापर करून जर आपण फेशियल तयार केलं आणि त्याचा वापर केला तर चेहऱ्यावर ग्लो येतो. यासाठी घरीच दह्याचं फेशियल कसं करायचं याची आपण माहिती घेणार आहोत.

दह्याचा फेशियलसाठी लागणारं साहित्य

– दही

– तांदळाचं पीठ

– मुलतानी माती

– मध

दह्यातील पोषक घटकांमुळं चेहरा उजळतो. तांदळाच्या पीठाचाही त्वचेला खूप फायदा होतो. तांदळाच्या पीठामुळं मुरूम आणि डागांची समस्याही कमी होते. मुलतानी मातीमधील घटकांमुळं चेहऱ्यावरील अतिरीक्त तेल, दुर्गंध, स्वच्छ होण्यास मदत होते. मधामुळं त्वचेत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामुळं कोरड्या त्वचेच्या समस्या निर्माण होत नाहीत.

त्वचेचं क्लिंजिंग करताना…

त्वचेचं क्लिजिंग करताना जर दह्याचा वापर केला तर यातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुळं त्वचेचा रंग उजळतो. यामुळं चेहऱ्यावरी मुरूम कमी होतात. यात असणाऱ्या अँटी ऑक्सिडेंट्समुळं त्वचा कोरडी पडत नाही. यासाठी पुढीलप्रमाणे क्रिया करा.

– सर्वात आधी 1 चमचा ताजं दही घ्या.

– आता त्यात 1 चमचा तांदळांच पीठ मिक्स करा

दह्याचा फेस पॅक लावण्याआधी एक स्वच्छ कापड गरम पाण्यात भिजवा. या कापडानं चेहरा स्वच्छ पुसून घ्या. यामुळं त्वचेची बंद रोमछिद्रे मोकळी होतात. आता हा दह्याचा फेस पॅक सर्क्युलर मोशननं चेहऱ्यावर लावा. त्वचा जास्त जोरातही रब करू नका. खूप हलक्या हातानं चेहऱ्याची मसाज करावी. 10 मिनिटे चेहऱ्यावर हे मास्क असाच ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ कापडाच्या मदतीनंच चेहरा पुसा.

दह्याचा फेस पॅक

साहित्य –

– 1 चमचा दही

– 1 चमचा मुलतानी माती

– 1 चमचा मध

वरील सर्व साहित्य एका वाटीत एकत्र करून पेस्ट तयार करा.

मुलतानी मातीमुळं तेलकट त्वचेची समस्या कमी होते. यामुळं रक्तप्रवाह वाढण्यासही मदत मिळते. ज्यामुळं त्वचेचा पोत चांगला होतो. मधात अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटी मायक्रोबियल गुण असतात हे गुण आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. मधामुळं त्वचेला थंडावा देखील मिळतो.

फेस पॅक लावण्याची पद्धत

– 1 ब्रश घेऊन त्याच्या मदतीनं हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

– डोळ्यांच्या खालीही तुम्ही लावू शकता.

– लावल्यानंतर जवळपास 20 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर ठेवावा. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

– या फेसपॅकमुळं त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. त्वचा मऊ देखील होते. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

दह्याचे फायदे –

दह्यामुळं चेहऱ्याला नॅचरल मॉश्चराईजर मिळतं. या फेसपॅकमुळं त्वचा एक्सफोलिएट देखील होते. महत्त्वाचे म्हणजे त्वचा खोलवर स्वच्छ होते. यात असणाऱ्या अँटी इंफ्लेमेटरी गुणांमुळं चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.