Skin Care Tips | ‘या’ वेळी केले लिंबूचे सेवन तर चमकदार होईल त्वचा, ब्लड प्रेशरमध्ये लाभदायक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Skin Care Tips | लिंबूपाणी (Lemon Water) सर्वांनाच आवडते. अनेकांना ते सकाळी पितात तर काहीजण जेवल्यानंतर पितात. त्याच वेळी, काही लोक वजन नियंत्रित करण्यासाठी भरपूर प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन (Consume Lemon Water) करतात. लिंबूपाण्याचे सेवन केले तर सौंदर्य वाढते. (Skin Care Tips)

 

लिंबूपाणी पिण्याची देखील एक योग्य वेळ आहे. दिवसातून दोन वेळा विशेषतः लिंबू पाणी प्यायल्यास सर्वाधिक फायदा होतो. या दोन वेळा आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

 

लिंबूपाणी पिण्याचे फायदे

 

1. त्वचेसाठी फायदेशीर :
जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण जर तुम्ही सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायले तर त्याचे अनेक फायदे होतील. त्याचा परिणाम चेहर्‍यावर आणि त्वचेवर दिसून येईल. रोज सकाळी कोमट लिंबूपाणी प्यायल्याने चेहरा आणि त्वचा चमकदार होईल. (Skin Care Tips)

 

2. व्हिटॅमिन आणि पोटॅशियमने समृद्ध :
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (vitamin c) मुबलक प्रमाणात आढळते, जे सर्दीशी लढण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे पोटॅशियम (potassium) मेंदू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवते. याव्यतिरिक्त, ते रक्तदाब नियंत्रित (blood pressure control) करते. लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होऊ लागते. याशिवाय यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेला मुलायम आणि निरोगी बनवते. (BP Control)

3. पचनशक्ती वाढवा :
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडतात. यामुळे पचनास (Digestion) मदत होते.
लिंबूमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने वजन कमी होते. यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

 

यावेळी सेवन करा :
दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने केली तर त्वचा सुंदर बनते. ते शरीराला डिटॉक्स (detox body drink) करण्याचे काम करते.
एवढेच नाही तर लिंबू पाणी शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करते.
त्वचेवर ग्लो वाढवण्याचे काम करते. यामुळे असे वाटते की तुम्ही महिन्यातून अनेक वेळा फेशियल आणि बॉडी पॉलिशिंग (body polishing) करत आहात.

 

जास्त तहान लागल्यावर लिंबूपाणी प्यायल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत होते.
मेंदूचा ताण दूर होतो आणि शरीरातील हॅप्पी हार्मोन्सची (happy hormones level) पातळी वाढवते. त्वचा चमकदार होते.

 

Web Title :- Skin Care Tips | skin care tips consume lemon at this time skin tone can improve beneficial in blood pressure too

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Earn Money | केवळ 25 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दर महिना होईल 50 हजारपर्यंत कमाई, जाणून घ्या कशी

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’