पावसात त्वचेच्या संसर्गाचा जास्त धोका, ‘या’ 5 चमत्कारी टिप्सद्वारे घ्या काळजी

पोलिसनामा ऑनलाइन – पावसाचे आगमन उन्हापासून दिलासा देत असले तरी या हंगामात त्वचा आणि इतर रोग होण्याचा धोकादेखील वाढतो. या हंगामात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. जर आपल्याला पावसाळ्यात स्कीनची काळजी वाटत असेल तर हे उपाय आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

1 स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या
पावसाळ्यात बहुतेक रोग घाणीमुळे पसरतात. अशा स्थितीत वेळोवेळी हात, चेहरा आणि पाय स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. चांगला फेस वॉश वापरून दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा. वॉटरप्रूफ क्लींजर देखील वापरू शकता.

2 टोनिंग देखील फायदेशीर
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता जास्त असते. या यामुळे त्वचेची छिद्र बूजली जातात. यामुळे मुरुमे येतात. यासाठी एखादा चांगला अँटी-बॅक्टेरियल टोनर देखील वापरू शकता. टोनरऐवजी गुलाब पाणी वापरू शकता.

3 मॉयश्चरायझेशन विसरू नका
अनेकांना वाटते की पावसात मॉयश्चरायझर लावल्यास त्वचा चिकट होईल पण असे नाही. पावसात त्वचेला पोषण देखील आवश्यक असते. पावसात, त्वचा वारंवार पाण्याने भिजल्याने कोरडी होते. यामुळे खाज सुटणे आणि पुरळ उठणे अशा समस्या होतात. अशा वेळी मॉयश्चरायझर लावा. ऑईल-फ्री मॉयश्चरायझर सुद्धा वापरू शकता.

ड्राय राहणे खूप महत्वाचे
आपण अनेकदा पावसात भिजतो. अशा स्थितीत संसर्ग होण्याचा धोका असतो. त्वचा जास्त वेळ ओली ठेवू नका. अन्यथा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.

पावसाळी उन्ह टाळा
पाऊस पडल्यानंतर उन पडते तेव्हा ते खुपच तीव्र असते. अशावेळी उन्हात बाहेर पडायचे असेल तर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like