Skincare Tips | उन्हाळ्यात चेहरा स्वच्छ आणि उजळ बनवण्यासाठी ट्राय करा ‘या’ 5 गोष्टी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – त्वचेला चटके देणारा हंगाम आला आहे. या काळात, कडक उन्हामुळे त्वचेचे नुकसान (Skincare Tips) होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात तुमचा चेहरा स्वच्छ आणि चमकदार ठेवायचा असेल तर या 5 टिप्स नक्की वापरा (Skincare Tips).

 

1. चेहर्‍यावर लावा एलोवेरा जेल (Apply Aloe Vera Gel On The Face)
कोरफडीचे फायदे (Benefits Of Aloe Vera) सर्वांनाच माहीत आहेत. उन्हाळ्यात, चेहर्‍यावर जळजळ, चट्टे किंवा अगदी सामान्य काळजीसाठी सुद्धा एलोवेरा लावा. एलोवेराचे रोप घरच्या घरी लावू शकता किंवा ते बाजारातही सहज उपलब्ध आहे. हे केव्हाही लावता येत असले, तरी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर एलोवेरा जेल लावल्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते (Skincare Tips).

 

2. लिंबाचा रस (Lemon Juice)
लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) चांगल्या प्रमाणात असते आणि व्हिटॅमिन-सी चेहर्‍यावर झटपट चमक आणण्याचे काम करते. लिंबाचा रस थेट त्वचेवर लावण्याऐवजी बेसन (Gram Flour) किंवा कोरफडीमध्ये मिसळून लावू शकता.

 

3. दही (Yogurt)
दही त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला आवश्यक ओलावा तर मिळतोच शिवाय घाणही स्वच्छ होते. दह्यात हळद मिसळून पेस्ट तयार करा आणि ती सुकतेपर्यंत चेहर्‍यावर ठेवा. यामुळे त्वचा चमकदार होईल आणि टॅनिंगही (Tanning) निघून जाईल.

 

4. टोमॅटोचा रस (Tomato Juice)
टोमॅटोच्या रसामध्ये आवश्यक पोषक घटक देखील असतात, जे त्वचेला आतून स्वच्छ करण्याचे काम करतात. यासाठी बेसनामध्ये टोमॅटोचा रस मिसळून फेस पॅक (Face Pack) तयार करू शकता किंवा थेट त्वचेवरही लावू शकता. यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसेल.

5. खोबरेल तेल (Coconut Oil)
त्वचेसाठी खोबरेल तेलही खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही मेकअप काढण्यासाठी (Makeup Remove ) करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Skincare Tips | skincare tips for clear and glowing skin during summer
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Red Meat Health Risk | लाल मांस जास्त खाणार्‍यांमध्ये या गंभीर आजारांचा धोका जास्त; जाणून घ्या

 

Skin Cancer Symptoms | तुमचे डोळेही देतात कॅन्सरचे संकेत, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

 

Nails Health | ‘या’ 4 कारणामुळे खराब आणि कमजोर होतात नखे, आजारांचा देतात संकेत; जाणून घ्या