‘कोरोना’च्या काळात वजन कमी करण्यासाठी घरातच करा ‘स्किपिंग’, जाणून घ्या किती कॅलरीज् होतात ‘बर्न’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   स्किपिंग म्हणजे रश्शी उडी एक मजेदार एक्सरसाईज आहे. फिटनेस एक्सपर्टस यास एक उत्कृष्ट कार्डियो एक्सरसाईज मानतात. ही वेट लॉससाठी खुप लाभदायक आहे. कोरोना महामारीमुळे जीम बंद असल्याने घरातल्या घरात हा व्यायाम तुम्ही करू शकता. वेट लॉससाठी एक्सपर्ट्स 10-20 मिनिटापर्यंत स्किपिंग करण्याचा सल्ला देतात. यामुळे योग्य प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, केवळ एका मिनिटांच्या रश्शी उडीमुळे तुम्ही 15-20 कॅलरी बर्न करू शकता. अशाप्रकारे 15 मिनिट एक्सरसाइज केल्यास एक सेशनमध्ये 200-300 पर्यंत कॅलरी बर्न होऊ शकतात.

स्किपिंगचे हे आहेत फायदे

1 कॅलरीज बर्न होतात.

2 स्किपिंगच्या वेळी हार्ट रेट वाढतो, यामुळे हृदय मजबूत होते. कार्डियो व्हॅस्कुलर आजारांचा धोका कमी होतो.

3 वेट लॉस होते, लठ्ठपणा कमी होतो.

4 कँसर, टाईप 2 डायबिटीज आणि अन्य आजार दूर राहतात.

हे लक्षात ठेवा

* खुल्या जागेत, गार्डन, टेरेसवर हा व्यायाम करा.

* चांगल्या स्किपिंग रोपचा वापर करा. मजबूत, पकडण्यास सोपी, चांगल्या क्वालिटीची रशी घ्या. ती प्लास्टिकची नसावी.

* स्किपिंग करतेवेळी आपल्या पायाच्या गुडघ्यांवर जास्त जोर देऊ नका. एकावेळी 30-40 वेळाच उडी मारा. नंतर, थोड़ा ब्रेक घ्या आणि पुन्हा स्किपिंग करा.

* योग्य उंचीची दोरी घ्या.