येत्या 24 तासात ‘या’ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सध्या बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आल्याने पटनावासियांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागात 6 – 7 फूट पाणी भरले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी देखील पावसामुळे आपल्या घरात 4 दिवसांपासून अडकून होते त्यांना एनडीआरएफ टीमने बाहेर काढले. हाहाकार माजवलेल्या पावसाने बिहारमध्ये 42 लोकांचा जीव घेतला. तर उत्तर प्रदेशात पावसाने कहर केल्याने 111 जणांना आपला जीव गमवावा लागला.

यूपी में बारिश के बाद विभिन्न हादसों में अब तक 111 की मौत

हवामान विभागाने सांगितले की बुधवारी देखील दक्षिण उत्तर प्रदेशात आणि पश्चिम बिहारमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. शिवाय ओडिसा, झारखंड आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भागात पाऊस पडू शकतो. स्कायमेटने माहिती दिली की प्रयागराज, वाराणसी, पटना, गया, जमशेदपूर, रांची, कोलकत्ता भागात पावसाचा जोर वाढू शकतो.

अप्तकालीन प्रबंधन विभागाचे बिहारचे मुख्य सचिव पार्तिया अमित यांनी सांगितले की, भागलपूरमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि कहलगाव बेल्ट यामुळे पूर्णता पाण्याखाली आहे. एनडीआरएफची टीम या भागात तैनात करण्यात आली होती. पूरग्रस्तांना निवारा केंद्र आणि सार्वजनिक स्वयंपाक घराची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत बिहारमध्ये 42 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 16 जिल्ह्यात पावसाचा प्रभाव आहे.

पटना में एनडीआरएफ की 6 टीमें तैनात

उत्तरप्रदेशात महापूराने 111 बळी घेतले आहेत. मंगळवारी 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. 25 सप्टेंबरपासून आतापर्यंत झालेल्या घटनांमध्ये 111 लोकांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिल्लीकरांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत वातावरणात बदल होणार आहे, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हा बदल दिसून येईल.

 

Visit : Policenama.com