कर्नाटक विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मे गौडा यांचा रेल्वे ट्रॅकवर मिळाला मृतदेह, आत्महत्येचा संशय, प्रचंड खळबळ

बेंगळुरु : कर्नाटक विधान परिषदेचे उपाध्यक्ष एसएल धर्मे गौडा ( sl dharme gowda) यांनी कथित प्रकारे आत्महत्या केली आहे. जेडीएस आमदाराचा छिन्नविछिन्न मृतदेह मध्य कर्नाटकच्या पर्वतीय भागात त्यांचे मुळ शहर चिकमगलूरच्या जवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, त्यांचा मृतदेह पहाटे 2 वाजता (29 डिसेंबर) च्या सुमारास सापडला. 64 वर्षीय गौडा काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यांनी सभागृहात घेरल्याने चर्चेत आले होते. काँग्रेस सदस्यांचा आरोप होता की, ते बेकायदेशीरपणे सभागृहाची अध्यक्षता करत आहेत.

काँग्रेस सदस्यांनी खुर्चीतून खाली उतरवले होते
काही काँग्रेस सदस्यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीतून खाली खेचले होते. काँग्रेसवर आरोप आहे की त्यांनी सत्ताधारी भाजपासोबत मिळून वरिष्ठ सभागृह अध्यक्ष प्रताप चंद्र शेट्टी यांना बाहेर काढले.

धर्मे गौडा यांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकारणात वादळ येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काँग्रेसला पिंजर्‍यात उभे केले जाऊ शकते. त्यांचे भाऊ एसएल भोजे गौडा सुद्धा एमएलसी आणि कर्नाटकचे माजी सीएम एचडी कुमारस्वामी यांचे निकटवर्तीय आहेत.