SL vs ENG : जो रूट च्या विकेटची धुंदी…आपल्याच टीममेटला मारले ‘या’ श्रीलंकन खिळाडूने (व्हिडीओ)

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये विचित्र गोष्टी घडत असतात. श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये गॉल येथे खेळवण्यात येत असलेल्या सीरीजच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये सुद्धा असेच काहीसे पहायला मिळाले. इंग्लंडची टीम या टेस्ट मॅचमध्ये 74 धावांचे सोपे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करत होती. यामध्ये त्यांच्या 3 विकेट अवघ्या 14 धावांवरच पडल्या. यामध्ये एक विकेट त्यांचा कर्णधार जो रूटची होती, जो रनआऊट झाला.

जो रूट ची विकेट तो रनआऊट झाल्याने पडली. रूट सिंगल रन काढण्यासाठी धावत होता तेवढ्यात निरोशम डिकवेलाचा एक थ्रो थेट नॉन स्ट्रायकर एंडवर येऊन लागला आणि इंग्लिश कर्णधाराचा खेळ तिथेच संपला. श्रीलंकेला मिळालेली ही एक मोठी विकेट होती. सहाजिकच याचा आनंद सुद्धा मोठा होता. परंतु, रन आऊट करण्याच्या धुंदीत बुडालेला श्रीलंकन खेळाडू निरोशम डिकवेलाकडून तेव्हा असे काही घडले, जे केवळ कॅमेर्‍यांमध्येच कैद झाले नाही तर बघता-बघता जगभरात वायरलही झाले.

डिकवेलाचे हे कसले हाय-फाइव्ह ?
रूटला रनआऊट करण्याच्या आनंदात डिकवेला जेव्हा आपला सहकारी खेळाडू हसारंगला हाय-फाइव्ह करत होता, तेव्हा त्याचा निशाणा चुकला आणि त्याचा पंजा थेट जाऊन हसारंगाच्या चेहर्‍यावर हिट झाला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर हसारंगा गोंधळून गेला होता.

सहवागने दिली अशी प्रतिक्रिया
हसारंगावरील डिकवेलाचा हा प्रहार चुकीने झाला यात कोणीही शंका नाही, परंतु या घटनेने जगतिक क्रिकेटमधील काही नामवंत लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. माजी भारतीय ओपनर वीरेंद्र सहवाग आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू केट क्रॉसने गॉलमधील डिकवेलाच्या प्रकारावर आपली रिअ‍ॅक्शन काही वेगळ्या पद्धतीने दिली आहे.