SL Vs WI Test Match | श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू बोल्ड होण्यापासून वाचला, पण हिट विकेट झाला (पहा व्हिडिओ )

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या श्रीलंका आणि वेस्ट इंडिज (SL Vs WI Test Match) यांच्यामध्ये टेस्ट मॅचची सिरीज सुरु आहे. यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये (SL Vs WI Test Match) एक मजेशीर घटना घडली आहे. श्रीलंकेचा ऑलराऊंडर धनंजया डिसिल्वाने (Dhananjaya de Silva) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी संयमी खेळी करत आपले अर्धशतक झळकावले. डिसिल्वा शतक करेल असं वाटत असतानाच तो अत्यंत निराशाजनक पद्धतीने आऊट झाला. डिसिल्वाच्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 95 व्या ओव्हरमध्ये शेनॉन गॅब्रेलच्या (Shannon Gabriel) ओव्हरमध्ये ही घटना घडली. गॅब्रेलने टाकलेल्या बॉलला डिसिल्वाने बॅट लावली, यानंतर बॉल स्टम्पच्या दिशेने जात होता, तेव्हा त्याने बॉलला स्टम्पपासून लांब केलं, पण या नादात त्याची बॅट स्टम्पला लागली. अशाप्रकारे आऊट झाल्याचं पाहून डिसिल्वालासुद्धा धक्का बसला. त्याने आपल्या खेळीत 95 बॉलमध्ये 61 रन केले.

डिसिल्वाच्या अर्धशतकाआधी (SL Vs WI Test Match) दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) आणि पथुम निसांका (Pathum Nisanka) यांनी श्रीलंकेला 139 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली होती. कर्णधार करुणारत्नेने 300 बॉलमध्ये 147 रन केले, तर निसांका 140 बॉलमध्ये 56 रन करून माघारी परतले. श्रीलंकेने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 386 रन केले.तर वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने (Roston Chase) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच वारिकनला 3 आणि गॅब्रेलला 2 विकेट मिळाल्या.

 

यानंतर श्रीलंकेची इनिंग संपल्यानंतर बॅटिंगला आलेल्या वेस्ट इंडिजचा स्कोअर दुसऱ्या दिवसाअखेर 113/6 एवढा झाला होता.
काईल मेयर्स 22 रनवर (Kyle Meyers) आणि जेसन होल्डर (Jason Holder) 1 रनवर खेळत होते.
ओपनर क्रेग ब्रॅथवेटने (Craig Brathwaite) सर्वाधिक 41 रन केले.
श्रीलंकेकडून रमेश मेंडिसला 3 (Ramesh Mendis), प्रवीण जयविक्रमाला 2 (Praveen Jayavikrama) आणि लसिथ एम्बुलडेनिया (Lasith Ambuldenia) याला 1 विकेट मिळाली.

 

Web Title :- SL Vs WI Test Match | sri lankas dhananjaya de silva gets hit wicket while saving himself from getting bowled watch video marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Narcotics Control Bureau | एनसीबी अधिकारी व्हायचायं?, काय पात्रता?, जाणून घ्या पगार आणि इतर सर्वकाही

Parambir Singh | परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात CM, DGP यांच्याकडे तक्रार

Numerology | अंक ज्योतिषनुसार ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी मातेची असते कृपा, कधीही भासत नाही पैशाची कमतरता

Honey Trap | 53 वर्षीय डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळले 2 लाख रुपये; व्हिडीओचा ‘मॅटर’मध्ये 2 महिलांसह 5 जण अटकेत